गृहपाठ करताना लहान मुलांची खूप चिडचिड होत असते. अशा वेळी ती गृहपाठ न करण्यासाठी बहाणा शोधू लागतात. काही मुलं पालकांनी ओरडल्यानंतर किंवा मारल्यानंतर गृहपाठ पूर्ण करतात. पण, काही मुलं इतकी हट्टी असतात की, ती काही केल्या अभ्यासासाठी तयार होत नाहीत. मग शिक्षकच कंटाळून निघून जातात. ही समस्या सर्वच देशांमधील मुलांमध्ये आढळते. अभ्यास न करण्यासाठी ते वेगवेगळे प्रयत्न करतात. पण, एका लहान मुलानं गृहपाठ न करण्यासाठी अशी युक्ती वापरली की, जी पाहून पालकांनाही धक्का बसला. ही घटना चीन देशामधील आहे.

संबंधित लहान मुलाला रोज गृहपाठ करावासा वाटत नव्हता. अशा परिस्थितीत त्यानं एक अशी पद्धत शोधून काढली की, जी त्याच्या पालकांना धक्का देण्यासाठी पुरेशी होती.

घराच्या खिडकीतून पाठवायचा ‘हेल्प मी’ नोट्स

‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’च्या रिपोर्टनुसार संबंधित लहान मुलगा पूर्व चीनच्या झेजियांग प्रांतातील रहिवासी आहे. गृहपाठ करताना तो घराच्या खिडकीतून ‘हेल्प मी’ नोट्स फेकत होता. प्रथम ही चिठ्ठी एका शेजाऱ्याला सापडली, जेव्हा त्यानं ही चिठ्ठी वाचली तेव्हा त्याला तशीच दुसरी एक चिठ्ठी सापडली आणि त्याची खात्री झाली की, कोणाला तरी मदतीची गरज आहे. शेजाऱ्यानं लगेच पोलिसांना बोलावलं. कारण- त्याला खिडकीतून कोणाच्या तरी रडण्याचा आवाज आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी शेजारच्यांना काहीतरी अनुचित प्रकार घडत असल्याचं जाणवलं. त्यामुळे त्यांनी तातडीनं पोलिसांना बोलावलं. इमर्जन्सी कॉलची माहिती मिळताच पोलिसही तातडीनं मुलापर्यंत पोहोचले. पोलिसांना पाहून मुलाचे कुटुंबीय स्तब्ध झाले. यावेळी पोलिसांनी मदतीसाठी फेकलेल्या नोटसबाबत मुलाकडे विचारणा केली, तेव्हा तो त्या लहान मुलानं अभ्यास न करण्यासाठी केलेला प्लॅन होता हे पोलिसांना समजलं. त्यावर पोलिस म्हणाले की, ही सेवा आपत्कालीन परिस्थितीसाठी आहे आणि जर त्याचा गैरवापर झाला, तर कधीच कुणाला योग्य वेळी मदत मिळणार नाही. चीनमधील स्पर्धात्मक शिक्षणामुळे मुलं अनेकदा गृहपाठ करण्यास घाबरतात. एका मुलानं नुकतीच गृहपाठावरून पोलिस ठाण्यात जाऊन आईची तक्रार केली होती.