सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत आहेत, त्यापैकी काही खूप मजेदार असतात, ज्यांना पाहून लोक हसतात आणि काही आश्चर्यकारक व्हिडीओ देखील असतात. तुम्ही रोज आरशाकडे बघत असाल, पण एखाद्या प्राण्याला आरशाकडे पाहून घाबरून पळून जाताना पाहिले आहेत का? असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक कुत्रा स्वतःला आरशात पाहून घाबरतो आणि पळून जातो.

नक्की काय झालं?

व्हिडीओमध्ये कुत्रा मजेत चालत आरशाजवळ येतो. तो स्वतःला पाहून घाबरतो आणि उडी मारून तिथून पळून जातो. खरंतर आरशात स्वतःला बघतोय हेच त्याला कळत नाही, पलीकडे कुणीतरी आहे असं त्याला वाटतं आणि अचानक समोर पाहून तो घाबरतो.

(हे ही वाचा: सिंहाने पाणी पीत असलेल्या हरणावर केला हल्ला आणि…;बघा व्हायरल व्हिडीओ)

व्हिडीओ व्हायरल

असे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात, ज्यामध्ये प्राणी स्वतःला आरशात पाहून घाबरतात आणि एकतर पळून जातात किंवा आरशाशीच भांडू लागतात. व्हायरल होत असलेल्या कुत्र्याचा हा व्हिडीओ खूपच मजेशीर आहे, जो पाहून तुम्हीही हसाल.

(हे ही वाचा: बोलण्याची संधी मिळाली नाही म्हणून ‘नाचू’ लागली महिला; लाइव्ह टीव्ही डिबेट दरम्यानचा Video Viral)

(हे ही वाचा: Viral Video: स्वर्गासारखे हे सुंदर दृश्य पाहून तुम्हीही मंत्रमुग्ध व्हाल!)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

हा मजेशीर व्हिडीओ @buitengebieden_ या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत ५ लाख १७ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. ३१ हजारांहून अधिक लोकांनी व्हिडीओला लाइक देखील केले आहे. त्याचबरोबर व्हिडीओ पाहून अनेकांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत.