Accident Video: ‘अति घाई संकटात नेई’ हे वाक्य आपण अनेकदा वाचलं ऐकलं असेल. म्हणून उशीर होत असला तरी घाई न करता सुरक्षित प्रवास करावा, असं सांगितलं जातं. तरीही लोक आपलंच खरं करतात आणि अडचणीत सापडतात.

सोशल मीडियावर अनेकदा रस्ते अपघातांचे व्हिडीओ व्हायरल झालेले आपण पाहतो. त्यामधले काही अपघात हे वाहनचालकांच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असे भयंकर अपघात पाहून अक्षरश: अंगावर काटा येतो.

गाडी चालवताना नेहमी नियमांचं पालन करावं अशा सुरक्षिततेच्या सूचना अनेकदा देऊनही लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि आपला जीव धोक्यात टाकतात. एक अपघात आपलं आयुष्य संपवू शकतो हेदेखील आजकाल अनेकांना कळत नाही. सध्या असाच एक अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओ (Accident Viral Video)

अपघाताचा हा धक्कादायक व्हिडीओ पाहून काळजात भरेल धडकी. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये, एका रस्त्यावर वरदळ दिसतेय. अचानक एक बाईक ओव्हरटेक करायचं म्हणून ट्रकच्या डाव्या बाजूने भरवेगात जाण्याचा प्रयत्न करते. पण तितक्यात हा भयंकर अपघात होतो. भरवेगात असणारी बाईक ट्रकच्या टायरखाली चिरडली जाते. या अपघातात बाईकचालकाच्या मागे बसलेला तरुण आपले प्राण गमावतो. व्हिडीओच्या कॅप्शननुसार या तरुणाचं ३ महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं आणि आता हा भयंकर अपघात झाला. दरम्यान, हा अपघात तळेगाव चाकण मार्गावर झाल्याचं बोललं जातंय.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @chaltaboltanews या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला तब्बल २. ८ मिलियन व्ह्युज आले आहेत. तसंच “ती लिफ्ट ठरली शेवटची, ट्रकच्या अपघातात तरुण जागीच ठार, ३ महिन्यापूर्वीच झालं होतं लग्न” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “ड्रायव्हरला माणुसकी आहे तो पळून गेला नाही” तर दुसऱ्याने “म्हणून मोठ्या गाडीच्या जवळ जायचं नाही” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, ”वाचला असता बिचारा… खाली पडला तेव्हा त्याने समोरच्याला धरून ठेवलं, जे की धरायला नको होतं. धरलं नसतं तर बाजूला पडला असता आणि वाचला असता” तर एकाने ”बाईक चालकाला काय गरज होती एवढी घाई करायच अशी कमेंट केली.