Accident Viral video: आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आज प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे. हायस्पीड इंटरनेटमुळे मोबाईल फोनची क्रेझ लोकांमध्ये वाढतच चालली आहे. रात्री झोपताना, सकाळी उठताना, जेवताना किंवा प्रवार करताना प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो. अशातच गाडी चालवताना मोबाईलचा वापर टाळा, असं पोलिसांकडून वारंवार सांगण्यात येत. कारण, यामध्ये मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असते. अशा मंडळींचे डोळे उघडवणारा एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. एकापेक्षा एक भीषण अपघाताचे व्हिडीओ समोर येतात. अशीच एक अपघाताची घटना समोर आलीय. यूकेमध्ये एक ट्रक चालक ट्राक चालवताना मोबाईलमध्ये चक्क अश्लील व्हिडीओ पाहत होता. यावेळी लक्ष विचलित झाल्यानं त्याचा मोठा अपघात झालाय. मात्र यामध्ये निष्पाप व्यक्तीचा जागीच मृत्यू झालाय. या घटनेचा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
शुक्रवारी, १९ सप्टेंबर रोजी एका यूके ट्रक चालकाने लक्ष विचलित करून गाडी चालवल्यामुळे मृत्यू झाल्याचा गुन्हा कबूल केला. १७ मे २०२४ रोजी लँकेशायरमधील स्केल्मर्सडेल येथे ४३ वर्षीय नील प्लॅट महामार्गावर गाडी चालवत असताना हा घातक अपघात घडला. ट्रक चालवताना प्लॅट त्याच्या फोनवर व्यस्त होता. पुढे, असे उघड झाले की ड्रायव्हर गाडी चालवताना त्याच्या फोनवर अश्लील व्हिडीओ पाहण्यात खूप विचलित झाला होता, त्याचे समोरच्या रस्त्यावर लक्ष गेले नाही आणि तो महामार्गावरून जाणाऱ्या एका कारला धडकला. या प्राणघातक अपघातात, डॅनी एचिसन चालवत असलेल्या ह्युंदाई कोना गाडीला ट्रकने धडक दिली तेव्हा त्याचा स्फोट झाला. दोन मुलांचे वडील एचिसन यांना घटनास्थळी मृत घोषित करण्यात आले.
अपघाताच्या वेळी प्लॅट गाडी चालवत असताना ट्रकच्या आत असलेल्या फुटेजचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ट्रक चालवताना प्लॅट त्याच्या फोनमुळे खूप विचलित झाला आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की, तो बराच वेळ समोर रस्त्यावर बघतच नाहीते तर त्याचं संपूर्ण लक्ष हे मोबाईलमध्ये आहे. यावेळी अचानक तो ट्रक समोरच्या गाडीवर आदळला. धडकेनंतर काही क्षणातच स्तब्ध झालेला प्लॅट पश्चात्ताप करत आणि डोक्यावर हात जोडून दिसत होता.
पाहा व्हिडीओ
१९ सप्टेंबर रोजी झालेल्या न्यायालयीन सुनावणीत, प्लॅटने फोनवर लक्ष विचलित करून आणि अश्लील व्हिडीओ पाहण्यामुळे हा अपघात झाल्याचा दोष कबूल केला. यानंतर ट्रक चालक प्लॅटला १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली असून त्याची सुटका झाल्यानंतर त्याला सात वर्षांसाठी गाडी चालवण्यास बंदी घालण्यात येईल.