Shocking video: सोशल मीडियावर तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले असतील, रोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात अशातच आता एक धक्कादाय व्हिडीओ समोर आला आहे. आई आपल्या बाळासाठी काहीही करण्यासाठी तयार असते. मग अशावेळी ती आपल्या जीवाची देखील परवा करत नाही. पण कधी लेकरांनी आईचा जीव वाचवल्याचं तुम्ही ऐकलंय का? तेसुद्धा अवघ्या ३ वर्षांच्या चिमुकल्यानं? हो असंच काहीसं घडलंय. कधी कधी लहानगे असं काही करतात की मुर्तीपेक्षा किर्ती महान असं म्हणावं लागेल. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका महिलेच्या अंगावर तब्बल ११ हजार वोल्टेज असलेली विजेची तार पडली पण हा चिमुकला घाबरण्याऐवजी त्याच्या आईला मृत्यूच्या दारातून कसा बाहेर काढतो पाहाच. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वर्षांच्या मुलांना धड बोलायचं कसं ते कळत नाही त्या वयात या मुलानं चक्क हिरोसारखी कामगिरी करून दाखवली.ही घटना बिहारमधील किशनगंज येथे घडली आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला रस्त्याच्या कडेला उभी आहे. पण तितक्यात विजेची एक तार तिच्या अंगावर पडते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या तारेतून तब्बल ११ हजार वोल्टेज वीज प्रवाहित होत होती. तार खाली पडताच ३ वर्षांच्या मुलानं आपल्या आईला दूर खेचलं आणि तिचे प्राण वाचवले. अन्यथा जागेवरच तिचा मृत्यू झाला असता.
पाहा व्हिडीओ
लोक मुलाच्या धाडसाचं कौतुक करत आहेत
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एकसवर @@NBTBihar नावाच्या खात्यासह शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या मुलाचे लोक कौतुकही करत आहेत. एका युजरने कमेंट करताना लिहिले. ‘छोट्या पॅकेटने चमत्कार केला.’कमेंट करताना दुसऱ्या युजरने लिहिले, ‘हा छोटू हा एक मोठा धमाका आहे.’ आणखी एका युजरने कमेंट केली आहे की, ‘छोटा-मोठा असा फरक नसतो, ज्याच्याकडे धैर्य असते तोच जिंकतो.’ दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, ‘मोठे असण्याने काही फरक पडत नाही, लढण्यासाठी तुमच्याकडे हृदय असणे आवश्यक आहे.’ आणखी एका युजरने कमेंट केली आहे की, ‘मोठे झाल्यावर छोटे पॅकेट काहीतरी बनेल.’