Shocking video: देशभरातील तरुण नोकरीच्या शोधात आपलं शहर सोडून इतर शहरांमध्ये फिरत आहेत. प्रत्येकाला नोकरी हवी असते, पण सध्या नोकरी मिळणं तितकच अवघड असतं. देशात बेरोजगारी किती प्रमाणात वाढली आहे, याचे ताजं उदाहरण आता समोर आलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओत पुण्यामध्ये मुलाखतीसाठी आलेल्या तरुणांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. गेल्या काही काळात बेरोजगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अनेक उच्चशिक्षित तरुणांकडे नोकऱ्या नाहियेत. त्यामुळे नोकरी संदर्भात एक जरी जाहिरात दिसली तरी लोक अक्षरश: तुटून पडतात. अन् याचीच प्रचिती देणारा एका व्हिडीओ समोर आला आहे. पुण्यात एका कंपनीनं ५० पदांसाठी नोकरीची जाहिरात दिली होती. ही नोकरी मिळवण्यासाठी किती जणांनी गर्दी केलीये हे आता तुम्हीच पाहा. हा व्हिडीओ पाहून खरंच तुम्ही सुद्धा अवाक् व्हाल.

तुम्हीही नोकरीसाठी पुण्यात येण्याचा विचार करताय?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ एका कंपनीचा आहे. ही घटना पुण्यात घडली आहे. यूपीएस या कंपनीत ५० जागा रिक्त होत्या. यासाठी ४ ते ५ हजार लोक मुलाखतीसाठी आल्याचं दिसत आहे. त्याचा परिणाम असा झाला की गर्दी इतकी वाढली की, कंपनीबाहेर तरुणांची रांग उभी असलेली पाहायला मिळाली. जिथे प्रत्येकजण हातात बायोडेटा घेऊन आपली वेळ येण्याची वाट पाहत असतो. ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. कंपनीच्या बाहेर देखील प्रचंड गर्दी आहे. उमेदवार त्यांचे बायोडेटा गोळा करत आहेत जेणेकरून ते त्यांना आतमध्ये पाठवता येतील. रांगेत उभी असलेली सर्व मुलं-मुली वाट पाहत असतात. तुम्हीही नोकरीसाठी पुण्यात येण्याचा विचार करताय? तर हा व्हिडीओ पाहाच.

पाहा व्हिडीओ

“बापरे अवघड आहे तरुणांचं”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशातील बेरोजगारीची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. काहींनी वाढती लोकसंख्या देखील यामागचं कारण असल्याचं म्हटलं आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या असून व्हिडीओमध्येसुद्धा एक व्यक्ती तरुणांना हातातील नोकरी सोडू नका बाहेर मोठ्या प्रमाणात स्पर्धा असल्याचं सांगत आहे. तसेच नेटकरीही यावर आता प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “बापरे अवघड आहे तरुणांचं, एका नोकरीसाठी एवढे लोक” तर आणखी एकानं बेरोजगारीचं भीषण वास्तव अशी प्रतिक्रिया दिली आहे.