Shocking video: सोशल मीडियावर रोज लग्नाचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशातच एखाद्या लग्नातील सर्वात वाईट वेळ कोणती असू शकते? हा व्हिडिओ पाहून कदाचित या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळू शकेल… कल्पना करा की वराच्या पेहरावात तुम्ही स्टेजवर उभे आहात. तुमच्यासमोर होणारी वधू तुमचा हातात हात घेऊन उभी आहे. तुमची सगळे नातेवाईक आणि मित्र-मंडळी तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी समोर जमले आहेत आणि एवढ्यात तुमची एक्स-गर्लफ्रेंड तुमच्यासमोर रडत रडत येऊन उभी राहिली तर कल्पना करूनच सुन्न झालं असेल ना! पण अशी वेळ खरोखरच एका वरावर येऊन ठेपली आणि मग पुढे काय घडलं, त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावरही दाखल झाला. हा व्हिडिओ अल्पावधीतच व्हायरल झाला, हे काही वेगळं सांगायला नको.

सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. यातील अनेक व्हिडीओ असे असतात जे पाहून नेटकऱ्यांना तुफान मजा येते. तर काही व्हिडिओ पाहिल्यानंतरही आश्चर्याचा धक्काही बसतो. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. अनेकवेळा लग्नाच्या वेळीच असं काहीतरी घडतं की नवरी आणि नवरदेव दोन्हीकडील लोक गोंधळात पडतात. असं म्हटलं जातं, की विवाहसोहळा कधीकधी खूप तणावपूर्ण आणि नाट्यमयही असू शकतो. जर वधू किंवा वराचे लग्नाआधी इतर कोणाशी संबंध असतील तर लग्नात मोठा गोंधळही निर्माण होऊ शकतो. असं घडल्याचे अनेक व्हिडिओही आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. आता अशीच एक घटना समोर आली आहे. ज्यात लग्नातच नवरदेवाच्या एक्स गर्लफ्रेंड्सने येऊन मोठा गोंधळ घातला.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, लग्न लागण्याआधी टीळक चा जो विधी असतो त्यासाठी नवरदेव स्टेजवर आलेला आहे. यावेळी अचानक एक तरुणी धावत धावत स्टेजवर येते आणि नवरदेवाला घट्ट पकडे आणि रडत रडत विनवण्या करताना दिसत आहे. ही तरुणी दुसरी तिसरी कोणी नसून नवरदेवाची एक्स गर्लफ्रेंड आहे. हे पाहताच नवरदेवही घाबरतो आणि तिला लांबकरण्याचा प्रयत्न करतो, हे पाहून आजूबाजूचे लोक पुढे येतात आणि तरुणीला स्टेजवरुन खाली घेऊन जातात.

पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by JANSEWA NEWS (@jansewanews)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अवघ्या १५ सेकंदांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय… एखाद्या बॉलिवूड सिनेमाला शोभेल अशी घटना असली तरी ती खऱ्या आयुष्यात घडलीय. या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं प्रतिक्रिया देत म्हंटलंय, “अशी वेळ कुणावरच येऊ नये”, तर आणखी एकानं “फार वाईट” अशी प्रतिक्रिया दिली आहे.