Viral video: सोशल मीडियाच्या जगात कधी काय पाहायला मिळेल ते सांगता येत नाही. अनेकवेळा आश्चर्यचकित करणारे व्हिडिओ समोर येतात. काही व्हिडीओ पाहिल्यानंतर विश्वास बसणे कठीण आहे की असे खरेच घडू शकते का? काही वेळा धक्कादायक व्हिडीओ ही पाहायला मिळतात. अलीकडे सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अलीकडे सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये नदीच्या काठावर जलपरी दिसल्याचा दावा केला जात आहे. हा व्हिडिओ चर्चेचा विषय बनला असून प्रत्येकजण या रहस्यमय घटनेबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, लोकांचा यावर विश्वास बसत नाही आहे की ती जलपरी आहे की नाही?

आपण अनेक दंतकथांमध्ये जलपरीचे नाव ऐकले असेल. हे काल्पनिक पात्र सत्यात खरोखर आहे की नाही याची खात्री अजून शास्त्रज्ञांना झालेली नाही. जलपरी म्हणजे पाण्यतली परी जिचे अर्ध शरीर मानवाचे तर अर्ध माशाचे असते. म्हणजेच जलपरीचा कमरेपर्यंतचा भाग हा एका मानवांसारखा असतो तर कमरेखालचा भाग माशासारखा असतो. जलपरीची हीच अनोखी खासियत तिच्याविषयी आकर्षण निर्माण करते. तिचे हे अनोखे रूप पाहण्यासाठी लोक नेहमीच तिच्या शोधात असतात आणि नुकताच आता सोशल मीडियावर एका खऱ्याखुऱ्या जलपरीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात जलपरी पाण्यात एका खडकावर बसलेली दिसून आली. तिला पाहताच बोटीवर फिरत असलेल्या लोकांनी तिला पकडलं आणि मग काय घडलं ते चला जाणून घेऊया.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक जलपरी किनाऱ्यावरील खडकावर बसली आहे. शिकाऱ्यांनी तिला पकडण्याचा कट रचला आणि पुढे पाण्यात जाळे टाकण्यात आले आणि जलपरी त्यात अडकली. त्यात एका जलपरीला धरलेल्या लोकांचा एक गट दाखवला आहे. जलपरी तिच्यासमोर माणसे पाहून आश्चर्यचकित झालेली दिसते. हा व्हिडिओ खरा आहे खोटा याची सत्यता अजून समोर आली नाही पण व्हिडिओ मात्र इंटरनेटवर आता जोरदार शेअर केला जात आहे.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ viralversevorld नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.