Viral video: सोशल मीडियावर अनेकदा अपघातांचे व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहिले असतील. त्यात अनेकदा रेल्वे अपघातांचं प्रमाणदेखील जास्त असतं. मजा-मस्तीसाठी ट्रेनमध्ये स्टंट करीत काही जण आपला जीव धोक्यात टाकतात; तर काही जण आत्महत्या करण्यासाठी ट्रेनच्या रुळांमध्ये जाऊन उभे राहतात. असे भयंकर अपघात पाहून अक्षरश: अंगावर काटा येतो.आजकाल सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक कोणतेही स्टंट्स करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. कधी रस्त्यांवर तर कधी रेल्वे ट्रॅकजवळ जीव धोक्यात घालून व्हिडिओ बनवले जातात. रेल्वे ट्रॅकवर रिल्स बनवल्याचे अनेक व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असणार. अलीकडेच असा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
ट्रेनच्या लोकोपायलटने अचानक ब्रेक लावून ट्रेन थांबवली. पण त्यानंतर जे घडलं ते आयुष्यात तुम्ही कधी पाहिलं नसेल. लोको पायलटचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता सुरुवातीला समोर काही गाड्या थांबलेल्या दिसतात. तर खाली जमिनीवर जिथं रेल्वे ट्रॅक आहे तिथं एक व्यक्ती झोपलेली दिसते. दुसरी व्यक्ती तिला तिथून उठवते. गाड्यांसाठी हा रेल्वे क्रॉसिंगचा मार्ग आहे. जिथं ट्रेन यायची असते तेव्हा फाटक बंद केलं जातं आणि रूळ ओलांडून पलिकडे जाणाऱ्या गाड्या, माणसं थांबतात. फाटक बंद असताना ही व्यक्ती मात्र रूळांवर जाऊन बसली. समोरून ट्रेन येत होती. सुदैवाने त्याआधी दुसऱ्या व्यक्तीने तिला ट्रॅकवरून उठवलं.
रेल्वे ट्रॅकवरून उठल्यानंतर ही व्यक्ती समोर थांबलेल्या गाड्यांकडे पाहून बोलताना दिसते. रेल्वे ट्रॅकवर गोंधळ घालणारी ही व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत असल्याचं सांगितलं जातं आहे. इतक्यात तिथं ट्रेन येते. ती ट्रेन तिथं थांबते. ट्रेनचा लोकोपायलट बाहेर येतो. त्याच्या हातात काहीतरी आहे. तो रेल्वे ट्रॅकजवळ गोंधळ घालणाऱ्या त्या व्यक्तीकडे जातो. एका हातात त्याला पकडतो आणि दुसऱ्या हातातील वस्तून त्याच्या पार्श्वभागावर मारतो. त्यानंतर ट्रॅकवर ढकलून देतो.
त्याला लोकपायलटने चांगलाच धडा शिकवला. त्याच्या या कृत्यामुळे केवळ त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला नाही तर ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या शेकडो प्रवाशांच्या सुरक्षेलाही मोठा धोका निर्माण झाला असता. लोको पायलटला ट्रॅकवर कोणीतरी उभं असल्याचं लक्षात येताच त्याने ताबडतोब आपत्कालीन ब्रेक लावले आणि ट्रेन थांबवली. ट्रेनमधून बाहेर येत त्या व्यक्तीला अद्दल घडवली.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @adv_soyyab नावाच्या अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला असून व्हिडीओ पाहून नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.