साप, अजगर, अॅनाकोंडा अशी नावं ऐकली तरी आपल्या अंगावर काटा येतो. पण कल्पना करा, जर एक महाकाय अजगर तुमच्या समोर आला तर काय होईल? सध्या सोशल मीडियावर एका महाकाय अजगराचा असाच एक शॉकिंग व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात समुद्राच्या तळाशी एका व्यक्तीची एका महाकाय अजगरासोबत टक्कर होते, हा व्यक्ती थेट अजगराच्या तोंडाजवळ येऊन थांबतो. यानंतर पुढे जे काही होते ते पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल.
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती समुद्राच्या तळाशी आरामात पोहत असतो. पाण्याखालील समुद्राचे सुंदर दृश्य पाहण्याचा आनंद घेत असतो. पण एका टप्प्यात एक अनपेक्षित घटना घडते. एक महाकाय अजगर भक्ष्याच्या शोधात त्याच्या समोर येत असतो. तो पहिल्यानंतर प्रथम ती व्यक्ती घाबरते. पण हिंमत करून तो अजगराच्या दिशेने येतो. अजगर त्याला सह गिळू शकेल इतक्या अंतरावरून येऊन तो व्यक्ती उभा राहतो.
यावेळी तो व्यक्ती न घाबरता अजगराच्या अगदी चेहऱ्याजवळ कॅमेरा धरत व्हिडीओ शूट करण्यास सुरुवात करतो. अजगर आणि तो व्यक्ती बराच वेळ एकमेकांकडे टक लागून बघत असते. यानंतर अजगर अचानक आपला मार्ग बदलतो आणि तिथून निघून जातो. सुदैवाने अजगर त्या व्यक्तीला काही न करता तिथून निघून जातो. जे पाहून जीव भांड्यात पडतो. एका दुसऱ्या व्यक्तीने हा थरारक घटनेचा व्हिडीओ शूट केला आहे. Oops That’s Deadly या ट्विटर अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर आता नेटिझन्स वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. काहीजण हा व्हिडीओ धडकी भरवणारा आहे म्हणतायत तर काही जण तो पाहून थक्क झाले आहेत.