Viral video: लोकांचा आज-काल जिममध्ये जाण्याचा ट्रेंड खूपच वाढला आहे. दररोज व्यायाम करणं हे शरीरासाठी चांगलं असतं. व्यायामामुळे शरीर आणि मन सुदृढ राहातं. आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते. आपण आजारांपासून दूर राहातो. वजन नियंत्रणात राहातं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण दिवसभर उत्साही राहातो. पण हल्लीच्या सोशल मीडिया जगात बहुतांश लोक जीममध्ये जाऊन व्यायाम करण्याऐवजी भलतंच काहीतरी करतात. असाच एक धक्कादायक व्हिडीओ आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. मुंबईतील गोरेगाव पूर्वेतील यूमेनिया फिटनेस जीममध्ये ट्राइसेप्ससाठी व्यायामाच्या उपकरणांवरून जीममध्ये मोठा वाद झाला. ज्यामध्ये या वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले. ज्यामध्ये २५ वर्षीय तरुणाला जीममधील ३ जणांनी मारहाण केली. मारहाण केल्यानंतर तो तरुण गंभीर जखमी झाला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
झालं असं की, गौरव मिश्रा हा जीममध्ये व्यायाम करण्यासाठी आला होता. तो तिथे ट्रायसेप्स मारत असताना तिथेच मुथ्थू देखील व्यायाम करत होता. ट्रायसेप्स मशीनजवळील बेंचवर झोपलेल्या मुथ्थूने गौरवला तिथे असणारी देण्यास सांगितले. मात्र, दोरी देण्यास गौरव मिश्राने नकार दिला. त्यानंतर मुथ्थूला प्रचंड राग आला आणि त्याने गौरव मिश्राला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या वादाचे रुपांतर थेट हिंसाचारात झाले. त्यानंतर त्याने गौरव मिश्राला मारहाण केली. ही मारहाण सुरु असतानाच यामध्ये मुथ्थूचे दोन मित्र लव शिंदे आणि कार्तिक अमीन हे पडले. तिघांनीही गौरव मिश्राला मारहाण केली. यामध्ये चिडलेल्या मुथ्थूने थेट गौरव मिश्राच्या डोक्यावर रॉडने वार केले. ज्यामध्ये गौरव गंभीर जखमी झाला. २५ वर्षीय जिम ट्रेनरने यामध्ये हस्तक्षेप करत मिश्राला वाचवले. त्यानंतर गौरवला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या डोक्याला अनेक टाके पडले आहेत.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ trend_indnews नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, “हे फार चुकीचे आहे यामुळे किती मोठा अनर्थ होऊ शकतो याची कल्पना आहे का?” तर आणखी एकानं “क्षणभराचा राग अन् आयुष्यभर पश्चाताप होईल असं करु नका.” असं म्हंटलंय.