Shocking Video: अमेरिकेतील ब्रेवार्ड काउंटीतील रहिवासी घाबरले, कारण त्यांनी एका मोठ्या अमेरिकन मगरीला कालव्यात पोहताना पाहिले. पण घाबरण्याचं खरं कारणच नाही तर त्या मगरीच्या तोंडात एक मोठा कुत्रा होता. हा प्रकार साउथ पॅट्रिक शोर्सजवळ, सी पार्क बुलेव्हार्ड आणि साउथ पॅट्रिक ड्राईव्ह येथे झाला. या घटनेनंतर फ्लोरिडा फिश अँड वाइल्डलाइफ कमिशन (FWC) चे अधिकारी लगेचच तेथे पोहोचले.
अग्निशामक दल तेथे पोहोचल्यावर अनेक शेजारी थांबून पाहत होते. त्यांचे म्हणणे आहे की त्यांनी याच ठिकाणी याआधीही मगरी पाहिल्या आहेत. स्थानिक लोक सांगतात की ती मगर तीन-चार वेळा दूर नेल्यानंतरही नेहमी सॅटेलाईट बीचजवळच्या त्याच पाण्याच्या जागी परत येते.
व्हायरल व्हिडीओ (Alligator Viral Video)
झॅक स्परलॉक नावाच्या एका स्थानिक व्यक्तीने हा व्हिडिओ शूट केला, जेव्हा त्याच्या मित्राने त्याला सांगितले की त्यांनी एका मगरीला कालव्यात पोहताना पाहिले, तिच्या तोंडात एक कुत्रा होता. झॅकने हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आणि तो खूप व्हायरल झाला.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ या @zackspurlock_ इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “आम्ही गेली ३ वर्षे या मगरीला आहोत. सुरुवातीला ती खूप कमी वेळा दिसायची. पण आता लोकांचा आवाज ऐकताच ती थेट घाटावर येते. एका वर्षात किमान तिसऱ्या कुत्र्याला तिने मारले आहे. आता योग्य निर्णय काय घ्यावा? पुढचा बळी एखादं मूल ठरेल का? एक गोष्ट नक्की… कुत्र्याला दोरी लावणे हा उपाय नाही. ज्या कुटुंबाने आपला प्रिय मित्र गमावला, त्यांच्यासाठी प्रार्थना.” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.
या प्राणघातक घटनेनंतर, अधिकाऱ्यांनी मगरीला कायमचे कैदेत ठेवण्याचा निर्णय घेतला. “काळजीपूर्वक विचार केल्यानंतर, मगरीला कायमचे कैदेत ठेवण्यात आले आहे,” असे FWC ने म्हटले आहे.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. एकाने कमेंट करत लिहिलं, “त्या मगरीला पकडायलाच हवं. जर ती मगर कुत्रे पकडण्याचा एवढाच आत्मविश्वास बाळगत असेल तर लहान मूलाचा बळी जाण्यास वेळ लागणार नाही.” तर दुसऱ्याने “त्या मगरीला मारू नका, दुसरीकडे स्थलांतरीत करा” अशी कमेंट केली. तर एक कमेंट करत म्हणाला, “बापरे, त्या कुत्र्याबद्दल खूप वाईट वाटले”
