Elder man kissing woman on stage: सोशल मीडियावर अनेकदा डान्सचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. अनेक कार्यक्रम वा पार्टीमध्ये डान्स परफॉर्मन्स, गाणी अशा विविध गोष्टींचं आयोजन केलं जातं. आपल्या धकाधकीच्या जीवनात थोडं वेगळेपण यावं, तसंच सगळ्यांना याचा आनंद घेता यावा हेच याचं मुख्य कारण असतं. पण, आजकाल अनेकदा अशा कार्यक्रमांमध्ये अश्लील डान्सचं आयोजन केलं जातं. अशा कार्यक्रमांमध्ये अनेकदा गैरप्रकार, गैरवर्तणूक होताना दिसते.

सध्या असाच काहीसा प्रकार एका कार्यक्रमात घडला आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये तरुणी स्टेजवर डान्स करत असताना एक वयोवृद्ध माणूस तिच्याजवळ जातो आणि अश्लील कृत्य करू लागतो.

हेही वाचा… “कोर्टात जा आणि तक्रार कर…”, नामांकित कोचिंग इन्स्टिट्यूटच्या चेअरमनने केली शिवीगाळ, मीटिंगमध्ये कर्मचाऱ्याला ओरडला अन्…, पाहा VIDEO

आजोबांचा व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक तरुणी स्टेजवर डान्स परफॉर्मन्स करत आहे. यादरम्यान स्टेजवर आजोबा येतात, ती डान्स करत असताना तिच्या कमरेला पकडतात आणि तिच्याबरोबर डान्स करू लागतात. तिच्या गळ्यात हात टाकून अचानक तिला गालावर किस करतात. भरस्टेजवर आजूबाजूला जमलेल्या लोकांसमोर या आजोंबांचं हे कृत्य सुरू असतं; पण कोणीही त्यांना अडवायला जात नाही.

हा व्हिडीओ @sawantsamadhan2022 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “कसा आहे अप्पा” असं कॅप्शन याला देण्यात आलं आहे. तसंच या व्हिडीओला आप्पाचा विषय लई हार्ड आहे हे गाण जोडलं आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला एक मिलियन व्ह्युज आले आहेत. दरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळू शकलेले नाही.

हेही वाचा… VIDEO: उकळत्या पाण्याच्या टोपात पडला अन्…, माणसाबरोबर पुढे जे घडलं ते पाहून काळजाचा चुकेल ठोका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिले, “अप्पा, अटॅक येईल ओ, जरा दमानं” तर दुसऱ्याने “अप्पा जोमात, बाकी सगळे कोमात” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करीत म्हणाला, “आता हेच बाकी होतं बघायचं.” तर “किती अश्लीलता आहे,” अशी कमेंट एकाने केली.