Shocking Video: आगीशी कधी खेळ करू नये असं म्हणतात. कारण आगीत जर एखादी वस्तू होरपळली तर काहीच शिल्लक राहत नाही. म्हणून आगीशी सगळे चार हात लांबच असतात. पण काहीजण मस्करी आणि स्टंट करण्यासाठी आगीशी खेळ करतात. सध्या असाच काहीसा स्टंट दोन तरुणांनी केला आहे, जो त्यांच्यावरच बेतला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

आगीशी खेळ पडला भारी (Fire Video Viral)

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एका ठिकाणी बिल्डिंगचं बांधकाम सुरू आहे. तिथेच दोन तरुण आगीशी मस्ती करताना दिसत आहेत. यातला एक तरुण एका दारूच्या बॉटलला आग लवून ती दारू आजूबाजूला फेकताना दिसत आहे. या दारूला आग लावल्यामुळे आजूबाजूला ती फेकल्यानंतर सगळीकडे आग पसरताना दिसत आहे.

पण ती आग पसरत असतानाही त्या तरुणाला भान राहत नाही. आजूबाजूला आग पसरवत असताना तो त्याच्या मित्रावरही त्या बॉटलमधली दारू उडवतो आणि यामुळे त्याच्या मित्राच्या कपड्यांना आग लागते. कपड्यांनी पेट घेताच तो आग विझवण्याचा खूप प्रयत्न करतो. दोघंही त्याचं शर्ट फाडून टाकतात आणि आग विझवतात. दरम्यान, व्हिडीओत या आगीमुळे कोणालाही जास्त दुखापत झाली नसल्याचं दिसून येतंय.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @tracker_with_love या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला तब्बल ४२ लाखापेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत. तसंच “यात कोणाची चूक आहे”, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आलेली आहे. दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे अद्याप कळू शकलं नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून अनेकांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “नको ते खेळ खेळतात. जर तो गेला असता तर आई बसली असती रडत जन्मभर”, तर दुसऱ्याने “काहीही करून आयुष्याची वाट लावायची” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “काही गरज आहे का असं सगळं करायची?”