Huge snake enters railway station: सोशल मीडियावर सापांचे अनेक व्हिडीओ रोज व्हायरल होत असतात. साप हा शब्द जरी उच्चारला तरी अंगावर काटा येतो. साप हा असा सरपटणारा प्राणी आहे, जो कधीही, कुठेही लपून बसू शकतो. गावात किंवा जंगलाच्या आजूबाजूला असलेल्या मानवी वस्तीत साप हमखास पाहायला मिळतात. साप त्याच्या जबड्यापेक्षा मोठे भक्षदेखील गिळू शकतात, त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सापाची भीती वाटते. सोशल मीडियावर सापांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहून अंगावर शहारा येतो. सध्या असाच एक सापाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

प्लॅटफॉर्मवर दिसला भलामोठा साप

दरम्यान, यावेळी हा साप चक्क रेल्वेस्थानकावर आलाय. रेल्वेगाडीची प्रतीक्षा करत फलाटावर बसलेल्या प्रवाशांना तेथे अचानक साप दिसल्याने त्यांची चांगलीच तारांबळ उडाली. भीतीपोटी त्यांची पळापळ सुरू झाली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कुठे घडली घडली?

ही घटना ऋषिकेश रेल्वेस्थानकावर घडली असून घटनेचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. प्रवाशांंची गर्दी असलेल्या हृषिकेेश रेल्वेस्थानकावर भलामोठा साप आढळून आला. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ऋषिकेश रेल्वेस्थानकातील एका फलाटावर हा काळ्या रंगाचा लांब साप आलेला दिसत आहे. यावेळी साप बाहेर पडण्यासाठी रस्ता शोधत आहे. मात्र, साप जसा पुढे पुढे जातोय, तसे प्रवासी घाबरून पळू लागतात. हा साप सहा फुटांचा असूून तो मोठ्या वेगात दुसऱ्या ठिकाणी जाताना दिसून येतोय. मात्र, सापाला पाहून प्रत्येक प्रवाशाची धावाधाव होत आहे. यानंतर साप फलाटावर असलेल्या एका सीटखाली जाऊन लपून बसतो.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “काय गरज होती का?” बैलाच्या कानाजवळ वाजवला ताशा अन् शेवटी…; VIDEO पाहून तुम्हीच सांगा हे कितपत योग्य

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ @ManojSh28986262 नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, “हे भयानक आहे”, तर सापाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.