वर्षानुवर्षं महिलांवरील अत्याचारांची संख्या वाढतच चाललीय. सोशल मीडिया, बातम्यांद्वारे आपल्याला या सगळ्याची माहिती मिळते आणि माणूस म्हणून आपण कुठेतरी चुकतोय याची खंत वाटते. आजही देशात महिला असुरक्षित आहेत.

समाजातील काही विकृत लोक भररस्त्यात सगळ्यांसमोर महिलांची छेड काढतात, त्यांच्या नकळत अश्लील कृत्य करतात. पण याचा त्रास महिलांनाच जास्त होतो. या सगळ्या त्रासाला न जुमानता महिला खंबीरपणे उभ्या राहतात आणि अशा विकृत लोकांना वठणीवर आणतात. सध्या अशाच एका महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. जिने तिच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवला. नेमकं असं घडलं तरी काय, जाणून घेऊया…

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एका ट्रेनमध्ये महिलेच्या नकळत एक माणूस तिचा व्हिडीओ रेकॉर्ड करताना दिसतोय. महिलेचं लक्ष जाताच ती त्याला अडवण्याचा प्रयत्न करते आणि जाबदेखील विचारते. तसंच थोड्याचवेळात तिथे गर्दी जमा होते आणि ट्रेनमधील प्रवासीदेखील त्याला या कृत्याचा जाब विचारतात. अखेर व्हिडीओमध्ये तो माणूस माफी मागतानादेखील दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @inhnews24x7 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “चालत्या ट्रेनमध्ये एक पुरूष एका महिलेचा व्हिडिओ बनवत होता! प्रवाशांनी धडा शिकवला” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला एक लाखापेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत. यादरम्यान, ही घटना नेमकी कुठे आणि कधी घडली हे अद्याप कळू शकलं नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी या व्हिडीओवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “अशा माणसांना असंच पाहिजे” तर दुसऱ्याने “चांगलीच अद्दल घडवली तुम्ही” अशी कमेंट केली; तर एकजण कमेंट करत म्हणाला, “हद्दच झाली, यांना महिलांचा आदर करायला शिकवायला हवं”