Girls smoking video: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल झाल्याचे आपण पाहतो. त्यात डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. कधी मेट्रोत डान्स, तर कधी सार्वजनिक ठिकाणी, कधी रस्त्यांवर फक्त प्रसिद्धी मिळावी यासाठी खेळून अशा लोक अशा प्रकारचे व्हिडीओ करीत असतात. काही लाइक्स आणि कमेंट्ससाठी अनेक लोक आपली हद्द पार करू लागले आहेत. त्यात तरुणांची आणि लहान मुला-मुलींची संख्या जास्त आहे. आताच्या पिढीतील काही मुलं जगाचं भान विसरून आपली मर्यादा ओलांडू लागले आहेत.

शिकण्याच्या वयात ही मुले-मली चुकीच्या मार्गावर जात आहेत. सगळ्याचं भान विसरून थिल्लरपणा करू लागले आहेत. सध्या एक असाच लाजिरवाणा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये तीन अल्पवयीन मुली रील्ससाठी सिगारेट ओढताना दिसत आहेत.

हेही वाचा… माझं नशीब खराब आहे म्हणणाऱ्यांनी ‘हा’ VIDEO पाहा! चिमुकलीची अशी परिस्थिती पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

मुलींनी ओलांडली मर्यादा

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या व्हिडीओमध्ये तीन लहान मुली धूम्रपान करीत रील्स बनविताना दिसत आहेत. सोशल मीडियावर मिळणाऱ्या प्रसिद्धीसाठी आपल्या जीवाची पर्वा न करता, सगळ्या मर्यादा या मुलींनी ओलांडल्या आहेत. एका हिंदी गाण्यावर डान्स करीत तिघी सिगारेट ओढताना दिसत आहेत. त्यातली एक मुलगी खूप लहान आहे तरी तिलाही याचं व्यसन असल्याचं व्हिडीओमधून दिसतंय.

व्हिडीओची लिंक

https://www.instagram.com/meghabag65/reel/DD6zIWLSgJG/

सोशल मीडियावरील हा व्हिडीओ @meghabag65 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे आणि याला तब्बल ३.९ दशलक्ष व्ह्युज आले आहेत.

हेही वाचा… रडत रडत तिच्याजवळ गेला अन्…, कामावर जाणाऱ्या आईला मुलाची विनवणी, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या संतप्त प्रतिक्रिया

तिघींचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त करीत आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिले, “हे आहे आपल्या देशाचे भविष्य.” दुसऱ्याने, “मुलगी शिकली प्रगती झाली” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करीत म्हणाला, “दोघींनी स्वत: धूम्रपान केलं; पण त्या लहान मुलीलाही नाही सोडलं.” “यांचे आई-वडील यांना हेच शिकवितात वाटतं,” अशीदेखील कमेंट एकाने केली.