Shocking Video: नवरा बायकोचं नातं जगावेगळं असतं. या नात्यात जितकं प्रेम असतं तितकीच काळजी, तितकंच सुखदेखील असतं. पण आजकाल या नात्यात तितका गोडवा राहिलेला नाही. हल्ली लहान सहान गोष्टींवरून होणारे वाद मारहाणीपर्यंत पोहोचले आहेत. अशा नवरा बायकोच्या वादाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
अनेकदा नवरा बायकोची भांडण, त्यांच्यात झालेले वाद इतकंच नाही तर मारहाणदेखील व्हिडीओमध्ये दिसते. सध्या अशीच एक घटना एका घडली आहे ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत नवऱ्याने फोन घेतला म्हणून बायकोने काय केलं ते एकदा पाहाच…
बायकोचा व्हिडीओ व्हायरल… (Wife Viral Video)
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हाला धक्काच बसेल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक महिला तिच्या नवऱ्याशी भांडतेय. हा वाद अगदी टोकाला पोहोचून घरात तोडफोड करताना दिसतेय. व्हिडीओमध्ये तिचा नवरा, “बघा ही महिला काय करतेय, आज मी पोलिसांना दाखवणार हे. ही मला जीवे मारण्याची धमकी देतेय. मी पोलिसांना बोलवेन. ही मला मारून टाकेल.” असं सगळं बोलताना दिसतोय. तर भांडणारी महिला, “माझा गळा दाबला, मला फोन दे फोन दे असं म्हणत घरात तोडफोड करताना दिसतेय.”
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @rohitgeneral295 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “फोन घेणे पतीला महागात पडले. पत्नीने त्याला मारहाण केली” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. दरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडली आहे, हे अद्याप कळू शकले नाही.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “हा व्हिडिओ पोलिस स्टेशनमध्ये जाऊन दाखवा आणि तक्रार करा.” तर दुसऱ्याने “अशा महिलेला आधी अटक केली पाहिजे” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “यात नवऱ्याचीही काहीतरी चूक असेल”