Shocking Video: सोशल मीडियावर अनेकदा व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात अपघातांच्या व्हिडीओंचं प्रमाणही जास्त असतं. अशा अपघातांत माणसं गंभीर जखमी तरी होतात किंवा त्यांना मृत्यूला तरी सामोरं जावं लागतं.
अनावधानाने घडलेली एक चूक माणसाचं आयुष्य धोक्यात टाकू शकते. अशात कोणाची वाईट वेळ कधी सांगून येत नाही. अचानक दुर्घटना कधी घडेल आणि कोणाचं नशीब कसं त्याच्यावरच उलटेल हे काही सांगता यायचं नाही. सध्या अशीच दुर्घटना एका महिलेबरोबर घडली, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या घटनेत एक महिला थेट आकाशपाळण्यावरूनच खाली पडली. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊ या…
व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
छत्तीसगडमधल्या एका उद्यानात फिरण्यासाठी गेलेल्या एका महिलेबरोबर धक्कादायक घटना घडली. ती आकाशपाळण्यात बसली असताना, त्याचा दरवाजा अर्धवट उघडा असल्यामुळे तिचा तोल गेला. सुदैवाने, तिने वेळेतच आकाशपाळण्याच्या एका भागाला धरून ठेवले. त्या वेळी, आकाशपाळणा सांभाळणाऱ्या एका धाडसी कर्मचाऱ्याने तिला वाचवले. ही घटना भाटापारा, बालोदाबाजार, छत्तीसगड येथे घडली.
संपूर्ण घटना उद्यानात उपस्थित लोकांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली आणि हा थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, ती महिला आकाशपाळण्याला लटकलेली आहे आणि मदतीसाठी ओरडत आहे. तेव्हा एक धाडसी माणूस धावत जाऊन तिला मदत करतो.
तो माणूस कोणतेही सुरक्षा साधन न वापरता आकाशपाळण्यावर चढतो आणि अडकलेल्या महिलेपर्यंत पोहोचतो. तो तिचा हात धरून तिला शांत करतो आणि खालील काळजीपूर्वक उतरण्यास सांगतो. महिला त्याचा हात धरून खालील आकाशपाळण्याच्या जागेवर उडी मारते. त्याच्या धाडसामुळे ती महिला मोठ्या दुखापतीपासून वाचते.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @gaurav1307kumar या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “तो मदतीला आला नसता, तर ती महिला ३० फूट उंचीवरून खाली पडली असती.” तर दुसऱ्याने “देवासारखा धावून आला”