सोशल मीडियावर दर दुसऱ्या दिवशी अनोखे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातले काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही व्हिडीओ पाहून आपल्याला धक्काच बसतो. असे व्हिडीओ आपल्या कायम लक्षात राहतात. या डिजिटल युगात कोणतीही गोष्ट व्हायरल व्हायला जास्त वेळ लागत नाही. अशामध्ये अनेकदा स्टंटचे व्हिडीओदेखील व्हायरल होत असतात. ट्रेनमध्ये अनेकदा रीलसाठी जीवघेणा स्टंट करणाऱ्या तरुणांना तुम्ही पाहिलं असेलच.

आपण सिनेमांमध्ये अनेक वेळा स्टंटबाजी करताना पाहिली असेल, पण ते स्टंट खूप काळजी घेऊन केले जातात. सिनेमाची गोष्ट सोडली तर आता अनेक जण प्रत्यक्षात प्रसिद्धी, सोशल मीडियावरील काही व्ह्युज, लाइक्ससाठी स्वत:चा जीव धोक्यात घालतात. असे व्हिडीओ पाहून अनेकदा आपल्याच अंगावर काटा येतो. सध्या असाच जीवघेणा स्टंट एका तरुणीने केलाय आणि हा स्टंट तिच्या अंगलट आला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

रीलसाठी जीव धोक्यात

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक तरुणी रीलसाठी आपला जीव धोक्यात टाकताना दिसतेय. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, ट्रेन वेगात चालत असताना तरुणी ट्रेनच्या दरवाजाजवळ जाते आणि दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला लटकून उभी राहते. तेवढ्यात अचानक तिचं डोकं एका खांबाला आपटतं. खांबाला आपटल्यानंतर ती ट्रेनला पकडून उभी राहते जेणेकरून ती खाली कोसळत नाही.पण व्हिडीओमध्ये असं दिसून येतंय की तिला खूप जोराचा मार लागला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @ selfiee_of_kerala या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला १९ लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत. यादरम्यान ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळू शकले नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया

तरुणीचा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “सोशल मीडियावर मिळणाऱ्या प्रसिद्धीसाठी लोक स्वत:चा जीवदेखील धोक्यात टाकतात.” तर दुसऱ्याने “जे काही झालं ते तिच्याच चुकीमुळे झालं” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “बापरे! एका रीलसाठी जीवघेणा स्टंट करतात या मुली.”