Shocking video:  सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी मनोरंजक असतात, तर कधी हृदयाचे ठोके चुकवणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हाला धक्का बसेल. शार्क हा सर्वात खतरनाक माशांपैकी एक म्हणून ओळखला जातो. कारण शार्ककडे इतकी प्रचंड शक्ति असते की एका क्षणात तो बोट सुद्धा उलटी करू शकतो. महासागरात शार्कने हल्ला केल्याच्या कित्येक बातम्या आजवर समोर आल्या आहेत. शार्कशी पंगा घेणं म्हणजे जणू मृत्यूलाच आव्हान देण्यासारखंच आहे. या माशाच्या तावडीतून कुणीही वाचू शकत नाही. मात्र तुम्ही कधी शार्क माशानं मगरीची शिकार केल्याचं पाहिलंय का? ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेकडील नुलुनबॉय येथील टाउन बीचवर एका दुर्मिळ घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये शार्क माशानं चक्क किनाऱ्यावर येत एका मगरीची शिकार केली आहे.

शार्क आणि मगर हे दोघंही अतिशय क्रूर शिकारी म्हणून ओळखले जातात.या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता शार्क मासा आणि मगर आमने-सामने आहेत. १३ डिसेंबर रोजी गव्ह द्वीपकल्पातील या सुंदर किनाऱ्यावर शार्कने एका मगरावर हल्ला केल्याची घटना घडली. याचा थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. मगरींबद्दल बोलायचे झाले तर मगरी भयानक असतात. मगरींमध्ये सिंहाचीही शिकार करण्याची शक्ती आहे. मात्र शार्क माशाच्या ताकदीसमोर मगरीचंही काही चाललं नाही.

व्हिडिओत समुद्रकिनाऱ्यावर एक मगर दिसत आहे, तर तिचं डोकं पाण्यात बुडालेले आहे. त्याचवेळी एक मोठा बुल शार्क किनाऱ्यावर येताना दिसतो. काही सेकंदांतच शार्क मगराच्या डोक्यावर जबरदस्त हल्ला करतो आणि १० सेकंदांच्या संघर्षानंतर मगरीला पकडून खोल पाण्यात ओढतो. काही वेळेसाठी शार्क पाण्याखाली गायब होतो, पण नंतर तो परत वर येऊन मगराभोवती फिरतो. शेवटी, शार्क आणि मगर दोघेही पाण्याखाली अदृश्य होतात.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: शेवटी बाप बाप असतो! झोपलेल्या सिंहाची पिल्लानं चावली शेपटी; पुढे जे घडलं ते पाहून तुम्हीही व्हाल थक्क

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा हैराण करणारा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर amazing.sharks नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. समुद्रावरील शिकारीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज गेले आहेत. तसेच नेटकऱ्यांनी व्हिडिओ पाहून विविध प्रतिक्रियाही दिल्या आहेत.