Viral video: सोशल मीडियाचे जग मजेदार फोटो आणि प्राण्यांच्या व्हिडिओंनी भरलेले आहे. ज्या लोकांना प्राण्यांची खूप आवड आहे, ते अनेकदा त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर बघण्यात घालवतात. असे लोक पाळीव प्राण्यांना घरातील सदस्य मानतात आणि त्यांना सांभाळतात. तर असेही काही लोक आहेत जे या मुक्या प्राण्यांना त्रास देण्याचा आनंद घेतात. अशाच एका ठिकाणी चक्क सापाला आग लावून जाळून टाकलं आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हिडीओ पाहू सगळेच संतापले आहेत.

सोशल मीडियावर सापांचे अनेक व्हिडीओ रोज व्हायरल झाले आहेत. साप हा शब्द जरी उच्चारला तरी अंगावर काटा येतो. साप हा असा सरपटणारा प्राणी आहे जो कधीही कुठेही लापून बसू शकतो. गावात किंवा जंगलाच्या आजूबाजूला असलेल्या मानवी वस्तीत साप हमखास पाहायला मिळतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सापाची भीती वाटते. सोशल मीडियावर सापाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहून अंगावर शहारा येतो. सध्या असाच एक सापाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक जमीनीवर पेट्रोल टाकून आग लावली आहे आणि तिथे सापाला टाकलं आहे. यावेळी आगीत साप होरपळताना, तडफताना दिसत आहे. तो आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करतोय मात्र त्यातून त्याला बाहेर पडता येत नाहीये. अतिशय क्रूरपणे हा प्रकार करण्यात आला आहे. हा थरारक व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ smileplease1956_2.0 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं प्रतिक्रिया दिलीय, “घाबरु नको शेवटी इथेच फेडायच ए तुला, देवापेक्षा कर्म मोठे आहेत भाऊ हिशोब होणार” तर आणखी एक म्हणतो, “एक वेळ देव माफ करेल पण कर्म प्रत्येक पापाचं हिशोब ठेवतो” दुसरा म्हणतो “सर्प मित्राला फोन करायचा ना”