Vegetables in Monsoon Video: आपण अनेकदा मंडईतून भाज्या आणतो. विक्रेते नेहमी ती भाजी फ्रेश आहे असंच सांगतात. पण पावसाळ्यात अनेकदा याच भाज्यांमध्ये लहान मोठे कीटक असतात. अनेकदा पावसाळ्यात भाजी घेताना ती तपासून घ्यावी असं सांगितलं जातं.
पावसाळ्यात आजूबाजूचं वातावरण अस्वच्छ असतं त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता जास्त असते. तसंच वातावरण बदलामुळे आपल्याला आरोग्याची जास्त काळजी घ्यावी लागते. त्यात जर आपण पौष्टिक आणि आरोग्यदायी अन्न खाल्ल नाही तर पोटाचे विकार होतात, आणि पावसाळ्यात अशी परिस्थिती जास्त प्रमाणात पाहायला मिळते.
सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहून तुम्ही मंडईतून भाजी घेताना १०० वेळा विचार कराल.
फ्लॉवरच्या भाजीचा व्हिडीओ व्हायरल (Viral Viral)
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत आपण पाहू शकतो की एक महिला फ्लॉवर साफ करत असते आणि त्यात तिला चक्क गोम सापडते. व्हिडीओमध्ये महिला म्हणते, ”फुलकोबीची भाजी करता का तुम्ही तर जरा सांभाळूनच करा.. कारण आता फुलकोबीमध्ये काहीही निघू शकत. आता पर्यंत बारीक मोठ्या अळ्या निघायच्या पण आता मी फुलकोबी कापली ना तेव्हा त्यात खूप मोठी गोम सापडली, ही गोम पाहून आम्ही ती भाजी केली नाही फेकून दिली. तुम्ही सुद्धा दक्षता घ्या. म्हणूनच मी हा व्हिडीओ केला आहे. यात बारीक कीडे असू शकतात.”
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @anitagruhinikitchen या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला तब्बल ३ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत. तसंच “आता शंभर पायाचे जनावर बघा आश्चर्य वाटेल” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.
युजर्सच्या प्रतिक्रिया (Shocking Video)
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “गोम आहे ती”, तर दुसऱ्याने “खूपच धक्कादायक आहे हे” अशी कमेंट केली. तर एक महिला तिचा अनुभव सांगत म्हणाली, ”एकदा तर मी मेथीची भाजी निवडत असताना मोठी गोम निघाली होती”