Woman Jumps off Roof Beaten By in-Laws: सोशल मीडियावर सध्या असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे की तो पाहताच कोणाच्याही अंगावर शहारे येतील. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील अलीगढ जिल्ह्यातील असल्याचे सांगितले जाते. दोन मजली घराच्या छतावर एक महिला उभी असल्याचे दिसते आणि क्षणभरात ती खाली अंगणात थेट डोक्याने कोसळते. ज्या क्षणी ती खाली आपटते, तेव्हा आसपास उभ्या असलेल्या लोकांचे हृदय दचकल्याशिवाय राहत नाही.
रात्रीच्या शांततेत अचानक हृदयाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर आला आहे. छतावर उभी असलेली महिला क्षणात जमिनीवर कोसळते आणि जखमी अवस्थेत कण्हत असताना जे घडलं ते पाहून अंगावर काटा येईल. मदतीचा हात पुढे येईल असं वाटतं तोच तिच्या सासुरवाडीतील लोकांची निर्दयी वागणूक थरकाप उडवते. रुग्णवाहिका बोलावली जाईल, दवाखान्यात नेलं जाईल अशी अपेक्षा असताना नेमकं उलटं घडतं आणि पुढचे दृश्य पाहून तुमच्याही श्वासाचा वेग वाढेल…
पण, खरी धक्कादायक गोष्ट इथेच सुरू होते. साधारणपणे अशी दुर्घटना घडली की घरची मंडळी जखमीला उचलून रुग्णालयात घेऊन जातात. पण, या घटनेत त्याच्या पूर्ण उलट घडले. महिला गंभीर जखमी होऊन तडफडत पडली असतानाच तिच्याच सासरची मंडळी तिच्यावर झडप घालतात आणि तिला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करू लागतात. हा थरार पाहून उपस्थितांचेही मन सुन्न झाले.
व्हिडीओत काय दिसतंय?
क्लिपमध्ये स्पष्टपणे दिसते की, महिला छतावर काही वेळ थांबते आणि अचानक खाली उडी घेते. पडल्यावर तिची अवस्था अतिशय चिंताजनक दिसते. कपडे मळकट होतात, शरीराला गंभीर मार लागतो आणि ती वेदनांनी कण्हत असते. तरीही कोणी तिच्या मदतीला धावत नाहीत, उलट तिच्यावरच हल्ला चढवला जातो.
लोकांच्या प्रतिक्रिया
हा व्हिडीओ X (पूर्वीचे ट्विटर) वर @Zoyakhan7025 या अकाउंटवरून शेअर होताच प्रचंड वेगाने व्हायरल झाला. लाखो लोकांनी तो पाहिला आणि असंख्यांनी संताप व्यक्त केला.
एकाने लिहिले, “हे लोक माणूस नाहीत, राक्षस आहेत. अशा अमानुषतेला काय नाव द्यायचं?” दुसऱ्याने संताप व्यक्त केला, “देवीची पूजा करा आणि घरच्या देवीला मारहाण करा, हीच खरी दांभिकता!” तर काहींनी थेट कायद्याने कठोर कारवाईची मागणी केली आहे.
महिलेची स्थिती गंभीर
मिळालेल्या माहितीनुसार, महिलेला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, सासरच्या लोकांनी दाखवलेली निर्दयता आणि अमानुष वर्तन समाजाला हादरवून सोडणारे आहे.
येथे पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ पाहून एकच प्रश्न डोकं वर काढतो, मानवतेचं इतकं अध:पतन कसं झालं? जखमीला वाचवण्याऐवजी मारहाण करणे म्हणजे माणुसकीचं तत्त्व विसरणं नाही का?