Funny Shop Board Viral: सोशल मीडियाच्या या भन्नाट दुनियेत रोज काहीतरी अनोखं आणि भन्नाट व्हायरल होत असतं. काही लोक कंटेंट तयार करतात, तर काही लोक तो पाहून एन्जॉय करतात. पण, नुकताच एक फोटो असा व्हायरल झाला आहे की, पाहणाऱ्यांना पोट दुखेपर्यंत हसू आवरलं नाही. कारण- त्यात एका दुकानदारानं ग्राहकांचं ‘डोकं खाण्यापासून / त्रासापासून सुटका’ मिळवण्यासाठी असा बोर्ड लावला की, लोकांनी त्याचं कौतुकही केलं आणि गंमतही केली.

काय आहे त्या बोर्डवर लिहिलंय?

दुकानात कपडे घ्यायला गेल्यानंतर बहुतेकांना असं झालं असेल की, कपडा घरी आणल्यावर आई म्हणते, “मला आवडला नाही”, वडील ओरडतात “किती पैसे उधळतोस!”, बायको म्हणते “मी घालणार नाही” आणि काही तर म्हणतात की, “माझ्या फ्रेंडकडे हाच आहे!” … आता या सगळ्या ‘त्रासा’ला कंटाळलेल्या एका दुकानदारानं दुकानाच्या दारातच मोठा बोर्ड लावला, ज्यावर लिहिलं आहे

“आईला आवडलं नाही, वडिलांना राग आला, नवऱ्यानं घालू दिलं नाही, मैत्रिणीकडे असंच आहे, कोणत्याही कारणास्तव वस्तूची अदलाबदल होणार नाही!”

फोटो झाला धडाकेबाज व्हायरल

हा फोटो इन्स्टाग्रामवर @99_jodhpur नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. काही तासांतच हा फोटो धुमाकूळ घालत व्हायरल झाला. हजारो लोकांनी या फोटोवर ‘लाईक’ आणि ‘हसणारे इमोजी’ टाकले.
एका युजरनं मजेत लिहिलं, “दुसरा वाला मीच आहे!” तर दुसऱ्यानं म्हटलं, “वॉर्निंग देण्याची ही स्टाईल भारी आहे.”
तिसऱ्यानं खिल्ली उडवत विचारलं, “आणि जर छोटं-मोठं झालं तर काय?” चौथ्यानं तर लिहिलं, “हा कलर नाही आवडला, दुसरा मिळेल का?”

दुकानदाराचा सर्जनशीलपणा चर्चेत

लोकांना ही पोस्ट एवढी रंजक वाटली की, आता अनेकांनी ती शेअर करू,न “या दुकानदाराचा मेंदू भारी आहे” असं म्हणायला सुरुवात केली आहे. काहींनी तर त्याला ‘India’s Most Honest Shopkeeper’ असं नाव दिलंय. या बोर्डमुळे केवळ दुकानाचं नावच नाही, तर दुकानदाराचं सर्जनशील विनोदबुद्धीचं कौशल्यदेखील सोशल मीडियावर झळकलं.

लोकांच्या प्रतिक्रिया

एका कमेंटमध्ये लिहिलं होतं, “हे पाहून आता मी माझ्या दुकानात असाच बोर्ड लावणार!” दुसऱ्यानं म्हटलं, “आता तरी लोक बदलण्याचा आग्रह धरणार नाहीत.“

येथे पाहा फोटो

एकूणच या दुकानदाराच्या छोट्याशा कल्पनेनं इंटरनेटवर हशा पिकवला आहे. कुणालाही दुखावलं नाही; पण सगळ्यांना विचार करायला लावलं की, कधी कधी विनोदानं दिलेला मेसेज सर्वांत परिणामकारक असतो.
“ग्राहक देव असतो; पण कधी कधी देवाला थोडं हसवणंही जरुरीचं असतं!”