कणीक, पोहे चाळायला किंवा धान्य चाळण्यासाठी प्रत्येकाच्या घरी चाळणी वापरली जाते. बाजारात चाळणीचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. म्हणजे धान्य, पीठ, पोहे अशा अनेक प्रकारचे पदार्थ चाळण्यासाठी वेगवेगळी चाळणी असते. यात धान्य चाळणीच्या चाळणीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. विशेषत: गावाकडे तुम्हाला धान्य चाळण्याच्या मोठ-मोठ्या चाळण्या पाहायला मिळतात. या चाळणीच्या मदतीने अनेक गावांतील महिला तासनतास पोतीच्या पोती भरलेले धान्य चाळत असतात. पण, अशा चाळणीने धान्य चाळून हात खूप दुखतात. तसेच वेळही खूप जातो. पण, सोशल मीडियावर आता अशा एका चाळणीचा व्हिडीओ पाहायला मिळत आहे, ज्यात हात न लावता काही सेकंदात पोतंभर धान्य चाळून होत आहे. म्हणजे धान्याची दहा- बारा पोती शेतकरी काही मिनिटांत चाळू शकतात.
बाजारात आलेल्या नव्या इलेक्ट्रिक चाळणीने तुम्ही धान्यातील बारीक किडे- घाण अवघ्या काही सेकंदात साफ करू शकता. विशेषत: भरडलेल्या धान्यातील घाण या चाळणीमुळे काढणे सोपे होत आहे. यामुळे व्हायरल व्हिडीओतील ही इलेक्ट्रिक चाळणी आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, नाचणी चाळण्यासाठी एका इलेक्ट्रिक चाळणीचा वापर केला आहे. या चाळणीत फक्त धान्य टाकायचे, की ती चाळणी गोल फिरत अवघ्या काही सेकंदात किलोच्या किलो धान्य चाळून होत आहे. अनेक पोती धान्य या चाळणीच्या मदतीने कमी वेळात चाळून होत आहे. पण, ही मोटारवर चालणारी चाळणी असल्याने तिला इलेक्ट्रिक सप्लाय लागतो.
हा व्हिडीओ shetkarii_brand नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे, ज्यावर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने म्हटले की, अशा मशीन्स डेव्हलप झाल्याने घरातील महिलांची कामं कमी झाली आणि नको ते आजार वाढू लागले. तर दुसऱ्या एका युजरने लिहिलेय की, काय करणार, ते रांगडे हातच राहिले नाही जे क्लिंटलभर धान्य चाळू शकतील, काळाप्रमाणे बदल अजून काय… तर काहींनी कमेंट्समध्ये मशीनचा रेट विचारला आहे.