Aditya Thackeray kokan Tour : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे सिंधुदुर्गातील शिवसेनेला उभारी मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. आदित्य ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याची सुरुवात वैभव नाईक यांच्या आरोंदा गावातील निवासस्थानी भेट दिली. यावेळी नाईक कुटुंबियांच्या बाप्पाचेही आदित्य ठाकरेंनी दर्शन घेतले. यानंतर आदित्य ठाकरेंनी विनायक राऊतांच्या घरच्या बाप्पाचं दर्शन घेतलं, यावेळी बाप्पासमोर टाळ वाजवत भजनाचा आनंद घेत भजन केलं.

तुझ्या भक्तीत दंग, चढू दे भजनास रंग, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी विनायक राऊतांच्या घरी भजनाचा आनंद घेतलाय, याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विरोधक टिका करत आहेत, तर शिवसैनिकांनी आदित्य ठाकरेंच्या साधेपणाचं कौतुक केलं आहे. दरम्यान वेंगुर्ला तालुका प्रमुख बाळू परब यांच्या तुळस येथील निवासस्थानीही अदित्य ठाकरेंन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं, तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांसह छान गप्पाही मारल्या.

केसरकरांची टीका, आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे सिंधूदुर्गच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात आदित्य यांनी खासदार विनायक राऊत यांच्या घरी भेट दिली. आरती ओवाळून आदित्य ठाकरे यांचे विनायक राऊत यांच्या घरी स्वागत करण्यात आले. बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी भजनात मृदुंग, टाळ वाजवून भजनाला साथ दिली. आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्यावर शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी टीका केली आहे. त्यावर पलटवार करताना आदित्य ठाकरे यांनी ‘मी तर महाराष्ट्रातल्या घरातच चाललो आहे. त्यांच्यासारखे गुजरात आणि दिल्लीच्या घरात तर चाललो नाही ना?’ असा टोला लगावला.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: चोरानं अंडरवेअरमध्ये लपवली दारुची बाटली; पुढच्याच क्षणी व्यक्तीसोबत घडलं भयानक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून शिवसैनिक मोठ्या प्रमाणात हा व्हिडीओ शेअर करत आहेत. आज आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे.