Viral video: कुत्रा माणसाला चावला तर बातमी होत नाही, पण माणूस कुत्र्याला चावला तर बातमी होते. खरोखरच तशीच एक बातमी आहे. कारण एक चिमुकला खरंच एका कुत्र्याला चावला आहे. लहान मुलं खेळता खेळता काय करतील याचा नेम नाही. कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतं आहे. गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. गाडीवर जाणाऱ्यांचा पाठलाग असो, किंवा रस्त्यावरून जात असाल तरीही भटके कुत्रे हे टोळीने हल्ला करत आहे. शांतता असेल आणि एखादी व्यक्ती किंवा लहान मुलं एकटी असली की कुत्रे त्यांचेच राज्य असल्याप्रमाणे हल्ला करतात.मात्र आपल्याला त्रास देणाऱ्या कुत्र्याला या मुलानं चांगलीच अद्दल घडवली आहे. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून तुम्हीही पाहा हा व्हिडीओ…

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, व्हिडीओमध्ये एक मुलगा हातात बॅग घेऊन गाडीत ठेवताना दिसत आहे. तेवढ्यात एक कुत्रा तिथे येतो आणि मुलाला त्रास देऊ लागतो. मुलाला त्या कुत्र्याचा राग येतो आणि तो कुत्र्याचा बदला घ्यायला लागतो. पुढे तो मुलगा कुत्र्याला चावतो, ज्यामुळे कुत्रा जोरात ओरडतो. हा व्हिडीओ इथेच थांबतो.या चिमुकल्याच्या हुशारीमुळे जीव वाचला त्यामुळे सोशल मीडियावरही त्याचे नेटकरी कौतुक करत आहेत. तर पालकांनी आपल्या मुलांना असे एकटे सोडू नये असा सल्ला दिला आहे.

हा व्हिडीओ कुठला आहे, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. हा व्हिडीओ chandpurofficial नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> ऐकावं ते नवलच; टीव्ही, फ्रिजनंतर पंख्यासाठी कव्हर; आता पंखा स्वच्छ करायचं टेन्शन कायमचं दूर; पाहा VIDEO

संपुर्ण देशात भटक्या कुत्र्यांची दहशत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासहीत अनेक राज्यांमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत दिसून आली आहे. नुकतेच गुजरात राज्यात भटक्या कुत्र्यांनी दहशत माजवल्याचा प्रकार समोर आला होता. कुत्र्यांच्या या हल्ल्यात तीन वर्षांपासून ते वृद्ध लोकांपर्यंत अनेकांचा समावेश आहे. पायी चालत जाणे किंवा सायकल चालविणाऱ्यांना हे कुत्रे आपले लक्ष्य बनवितात.