Snake enters Dombivli Station railway station: सोशल मीडियावर सापांचे अनेक व्हिडीओ रोज व्हायरल होत असतात. साप हा शब्द जरी उच्चारला तरी अंगावर काटा येतो. साप हा असा सरपटणारा प्राणी आहे, जो कधीही, कुठेही लपून बसू शकतो. गावात किंवा जंगलाच्या आजूबाजूला असलेल्या मानवी वस्तीत साप हमखास पाहायला मिळतात. साप त्याच्या जबड्यापेक्षा मोठे भक्षदेखील गिळू शकतात, त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सापाची भीती वाटते. सोशल मीडियावर सापांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहून अंगावर शहारा येतो. सध्या असाच एक सापाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. डोंबिवली स्टेशनवर साप सापडल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. साप दिसताच लोक घाबरून वाट्टेल तिकडे पळू लागले.

दरम्यान, यावेळी हा साप चक्क रेल्वेस्थानकावर आलाय. रेल्वेगाडीची प्रतीक्षा करत फलाटावर बसलेल्या प्रवाशांना तेथे अचानक साप दिसल्याने त्यांची चांगलीच तारांबळ उडाली. भीतीपोटी त्यांची पळापळ सुरू झाली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.प्लॅटफॉर्म नंबर ३ वर कचऱ्याच्या डब्याजवळ हे पिल्लू लपलेलं आढळलं. यावेळी साप बाहेर पडण्यासाठी रस्ता शोधत आहे. मात्र, साप जसा पुढे पुढे जातोय, तसे प्रवासी घाबरून पळू लागतात. हा साप सहा छोटाचं असूून तो मोठ्या वेगात दुसऱ्या ठिकाणी जाताना दिसून येतोय. व्हिडीओमध्ये दिसणारं हे पिल्लू अजगराचं असावं, अशी शक्यता आहे. मात्र काही लोकांच्या मते तो धामण प्रजातीचा साप असावा, कारण त्याच्या शरीरावर लांबट आणि गडद पट्टे दिसत आहेत.

दरम्यान हा साप कुणालाही चावला नाही किंवा धावपळीत कोणी जखमीही झाले नाही.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ @jilha.varta नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, “हे भयानक आहे”, तर सापाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.