Snake Box Viral Video : निसर्गात अजूनही अनेक रहस्य लपलेली आहेत, जी वेळोवेळी उलगडत असतात. पाण्यापासून जमिनीपर्यंत अशी अनेक रहस्ये आहेत, ज्याबाबत अद्याप उलगडा झालेला नाही; त्यामुळे त्या रहस्यांबद्दल कोणालाही माहिती नाही. विशेषतः जेव्हा पुरातत्व विभागाचे लोक जमिनीखाली खोदकाम करतात तेव्हा काही रहस्यमय गोष्टी आणि खजिना हाती लागतो, ज्याची कोणी कल्पनाही केलेली नसते. साप जमिनीत पुरलेल्या खजिन्याचे रक्षण करतो हे तुम्ही ऐकलं असेल, पण तुम्ही कधी स्वतःच्या डोळ्यांनी असे दृश्य पाहिले आहे का? जर नसेल तर आत्ताच पाहा, कारण खजिन्याचे रक्षण करणाऱ्या सापाचा एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
खजिन्याचे रक्षण करणारा साप
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक माणूस मेटल डिटेक्टर घेऊन डोंगराच्या पायथ्याशी जातो, यावेळी तो परिसर स्कॅन करत असताना एका खडकाळ भागात डिटेक्टरचा आवाज येऊ लागतो. यावेळी उत्खनन करताना जमिनीखाली एक जुनी पेटी आढळते. यानंतर तो माणूस ती पेटी उघडतो, तेव्हा साप फणा काढून बाहेर येतो.
साप ज्या पद्धतीने पेटीतून बाहेर पडतो, त्यावरून असे दिसून येते की, जणू तो त्यात लपवलेल्या खजिन्याचे रक्षण करत होता. साप पेटीतून बाहेर पडताच त्याच्यावर हल्ला करू लागतो, पण तो माणूस त्याला दूर करत खजिना बाहेर काढण्यात यशस्वी होतो. पेटीच्या आत अनेक जुनी सोन्या-चांदीची नाणी दिसतात, जी फार जुनी आणि मौल्यवान दिसत आहेत.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @_.archaeologist नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो पाहून लोक आश्चर्यचकित होत आहेत. अनेकांनी या व्हिडीओवर विविध प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, तुमचे काम खरोखरच अद्भुत आहे, तर दुसऱ्या युजरने लिहिले की, जर हा खजिना वर्षानुवर्षे जमिनीखाली होता, तर साप जिवंत कसा राहिला? अनेकांनी हा व्हिडीओ फक्त व्ह्युज आणि लाईक्ससाठी बनवला होता असा दावा केला आहे.