SSC Result 2024: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावेळी विद्यार्थ्यांसोबतच पालकांनाही उत्सुकता लागून राहिली होती.आता अखेर निकाल जाहीर झाल्यानंतर पालक आणि विद्यार्थ्यांनी जल्लोष केला आहे. सध्या अशाच एका खतरनाक सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मुलीच्या आईने घेतलेला बदला पाहून तुम्हीही चक्रावून जाल.

सगळी दुनिया जरी विरोधात गेली तरी आपले आई-वडिलच असतात जे आपल्यावर विश्वास ठेवतात. लाख वेळा आपण हरलो तरी आपल्या जिंकण्याची आशा करणारे हे फक्त आई-वडिलच असतात. अशाच एका आईचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जगासाठी एक मुलगा किंवा एक मुलगी असली तरी आई-वडिलांसाठी आपली लेकरं ही राजकुमार किंवा राजकमारीपेक्षा कमी नसतात. अशावेळी आपल्या मुलांना कुणी चुकीचं बोललेलेही आई-वडिल सहन करन घेत नाहीत. अशाच एका आईनं आपल्या मलीला मुद्दाम नावे ठेवणाऱ्या शेजाऱ्यांचा निकाल लागल्यानंतर जागीच पाणउतारा केला आहे. या एका व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मुलीची आई शेजारणीच्या घरासमोर जाऊन मोठ्यामोठ्याने ढोल वाजवताना दिसत आहे. यावेळी शेजरीन काहीही बोलत नाही फक्त बघत उभी आहे. यावेळी मुलगी आईला असं करण्यापासून रोखत आहे. मात्र आई काही एकायला तयार नाही. आपल्या मुलीला नावं ठेवणाऱ्या शेजाऱ्यांना चांगलाच धडा शिकवण्याचं तिनं ठरवलं असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> हेल्मेटनं मृत्यू रोखला; भर रस्त्यातला अपघाताचा VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका!

दहावीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ @jpsin1 नावाच्या एक्स अकाऊंटवरन शेअर करण्यात आला आहे. यावर युजर्स अनेक मजेदार कमेंट्स करत आहेत. एका युजरने याचं समर्थन केलंय तर काही युजर्सनी यावर टीका केली आहे.

आपल्याकडे दहावी बारावीच्या निकालाला खूप महत्व दिले जाते. कोणाला किती टक्के मिळाले? कोण पहिला आला? अशा चर्चा रंगतात. यात अनुत्तीर्ण विद्यार्थी ही आयुष्यातील शेवटची परीक्षा समजून आपल्या भविष्याची काळजी करत राहतात. पण असे अनेक विद्यार्थी आहेत, जे दहावी, बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण होते. पण त्यांनी पुन्हा परीक्षा दिली. उत्तीर्ण झाले. आणि आज मोठ्या हुद्द्यावर कार्यरत आहेत.