मुंबईत ‘हक्काचं घर’ असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. शिक्षण, नोकरी तसेच विविध सोयीसुविधांनी परिपूर्ण असलेलं मुंबई शहर अनेकांची पहिली पसंती आहे. पण, मुंबई शहरातील घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. घर घेण्यासाठी आपल्यातील अनेकांना लोन (Loan) घ्यावे लागते. म्हणून काही जण नोकरी करून मुंबईत भाड्याच्या घरात राहतानादेखील दिसून येतात; तर आज सोशल मीडियावर मुंबईच्या घरांसंबधित एक पोस्ट व्हायरल होत आहे. एआयच्या मदतीने मंबईतील घरांची क्षितिजात कशाप्रकारे रचना केली जाईल, अशी कल्पना करून काही फोटो तयार केले आहेत.
कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजेंस (Artificial Intelligence) ज्याला आपण एआय (AI) म्हणून सध्या ओळखतो. ज्या गोष्टींच्या फक्त कल्पना करणे शक्य असते त्या एआयच्या मदतीने अस्तित्वात येऊ शकतात. विविध विषयांवर किंवा व्यक्तींवर आधारित एआयची खास छायाचित्रे सोशल मीडियावर अनेकांच्या पसंतीस उतरत असतात; तर आज या एआयच्या मदतीने मंबईतील घरांची क्षितिजात कशाप्रकारे रचना केली जाईल हे छायाचित्रांद्वारे दाखवण्यात आले आहे.
मुंबईच्या रिअल इस्टेट लँडस्केपच्या भविष्याची एक आकर्षक झलक दाखवली आहे. मुंबई शहरातील घरांच्या किमती लक्षात घेऊन कलाकार प्रतीक अरोरा यांनी मुंबईतील घरे क्षितिजात कशी दिसतील यांची छायाचित्रे तयार केली आहेत. तयार केलेल्या घरांना काचेच्या खिडक्या आणि दरवाजे आहेत. पण, त्या सर्वांची रचना एखाद्या स्पेसशिपसारखी दिसते आहे. इमारत, बंगला, घरे ढगांच्या अगदी मधोमध चित्रित करण्यात आली आहेत. मुंबईतील या अनोख्या घरांचे फोटो एकदा तुम्हीसुद्धा पोस्टमधून बघाच.
हेही वाचा… VIDEO: बापरे! २ कोटींच्या नोटा आणि ५० लाखांची नाणी, बाप्पासाठी बंगळुरुत केली अनोखी सजावट
पोस्ट नक्की बघा :
क्षितिजात मुंबईची घरे :
एआयच्या मदतीने पावसाळा ऋतुमध्ये या कलाकाराने काही पाण्यात चालणाऱ्या रिक्षांचे फोटो तयार केले होते; तर मुंबईच्या रस्त्यांवर हवेत चालणाऱ्या अंतराळवीरांचे व्हिडीओदेखील तयार केले होते. तर आजच्या घरांच्या किमती लक्षात घेऊन कलाकाराने मुंबईच्या घरांची रचना अंतराळवीरांच्या स्पेसशिपसारखी केली आहे, जे पाहून तुम्ही या घरांना एकटक बघत रहाल.
सोशल मीडियावर ही पोस्ट @prateekarora या युजरच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आली आहे. ‘प्रतीक अरोरा’ असे या कलाकाराचे नाव आहे. अनेकजण ही छायाचित्रे पाहून ‘भाडे दोन कोटी असेल’, ‘या घरांच्या आतमध्ये जायचं कसं ?’, तसेच एका नेटकऱ्याने ही घरे शहराभोवती फिरतील का ? असे विचारताचं ‘त्याचीसुद्धा वेगळी किंमत मोजावी लागेल’ अशी कमेंट युजरने केली आहे आणि सोशल मीडियावर ही छायाचित्रे व्हायरल होताना दिसून येत आहेत.