लग्न केवळ दोन व्यक्तींना नाही तर दोन कुटुंबांना एकत्र आणतं असं म्हणतात. नवी नवरी सासरी आल्यावर तिला सासू सासऱ्यांशी संपूर्ण कुटुंबाशी जुळवून घ्यावं लागतं. यात अनेकदा खटके उडतात, भांडण होतात, पण तरीही या सगळ्या गोष्टींना सांभाळून घेत सुनेला संसार करावा लागतो. अनेकदा अशा खटक्यांमध्ये काही मजेशीर गोष्टीही घडतात. सध्या सासू सुनेचा असाच मजेशीर व्हिडीओ व्हायरल होतोय.

लग्नानंतर अनेकदा नव्या नवरीला उखाणा घ्यावा लागतो. पण तुम्ही कधी सासू सुनेचा उखाणा ऐकला आहे का? सध्या अशी एक उखाण्याची जुगलबंदी व्हायरल होतेय, जी पाहून तुम्ही नक्कीच पोट धरून हसाल. सोशल मीडियावर सध्या सासू सुनेचा मजेशीर उखाणा व्हायरल होतोय. या उखाण्यात दोघींनी एकमेकींना चांगलाच टोमणा मारला आहे. नेमकं काय उखाणा घेतला आहे, या सासू सुनेने ते पाहाच…

सासू-सुनेचा उखाणा व्हायरल

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये सासू आणि सून उखाण्यांचा वापर करून एकमेकांना टोमणे मारताना दिसतायत. या व्हिडीओत सून किचनमध्ये जेवण बनवाताना दिसतेय. तेवढ्यात सुनेच्या बाजूने सासू जाते. सासू दिसल्या दिसल्या सून उखाणा घेत तिला टोमणे मारते. सून म्हणते, “दातात दात बत्तीस दात जरापण नाही लावत घरकामात हात” हे ऐकताच सासू किचनमध्ये पुन्हा येते आणि तिला म्हणते, “काळ्या मातीत विहिर खणली, आमच्या घरात काय तुला बसायसाठी आणली” सासूने हा उखाणा घेताच सुनेला धक्काच बसतो आणि ती पुन्हा एकदा आपल्या कामाला लागते.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @asach_paahije या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “सुनेचे टोमणे सासूचे प्रतिउत्तर” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल ९.३ मिलियन व्ह्यूज आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “सून आणि सासू दोघी पण खतरनाक आहेत” तर दुसऱ्याने “सासूबाई जोमात.. सूनबाई कोमात” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “आजी बाई खूपचं भारी उखाणा घेतला की” तर एकाने कमेंट करत लिहिलं, “आजी सुनेपेक्षा भारी आहे.”