एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधील अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू आहे. यादरम्यान फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीची (Swiggy) एक पोस्ट व्हायरल होत आहे. १२ वर्षांआधी टीम इंडियाने वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली होती. तर, स्विगीने १२ वर्षांमधील प्रत्येक दिवस, महिने, आठवडे, तास, सेकंद यांचे गणित मांडत आपल्या भावना अगदीच खास पद्धतीने व्यक्त केल्या आहेत.

स्विगीने एक खास पोस्ट शेअर केली आहे. आणि लिहिले की, प्रिय टीम इंडिया… बारा वर्षं, सात महिने आणि १७ दिवस आधी तुम्ही शेवटची विश्वचषक ट्रॉफी हातात उचलली होती. यातील ‘१५१ महिने’ तुमच्या सामन्यातील डॉट बॉल, रनआउट, एलबीडब्ल्यू अपील जे तुम्ही केले, त्याने सगळ्यांना वेड लावले. त्यातील ‘६५९ आठवडे’ रोहितचे पुल शॉट, बुमराहचे ओरडणे व सिराजचे सेलिब्रेशन यांचे आहेत. त्या प्रत्येक सामन्याच्या विजयानंतर आइस्क्रीम ऑर्डर करण्याचे ‘४,६१५ दिवस’. ‘११०,७३६ तास’ विराट, विराट असे मोठ्या आवाजात ओरडण्याचे. ‘६,६४४,१६० मिनिटे’ त्या प्रत्येक चार ते सहा विकेट्स आणि शतक यांच्यासाठी ज्यांनी भारतीय संघाला या दिवसाच्या अधिक जवळ आणले. आणि ‘३९८,६४९,६००’ सेकंदे फक्त आणि फक्त वाट बघण्याचे…

हेही वाचा…“World Cup चाहिए…” Ind Vs Aus फायनल सुरु होताच चाहत्यांमध्ये उत्साह, सोशल मीडियावर मजेशीर मीम्सचा पूर

पोस्ट नक्की बघा :

जिंकणं तर होतंच राहतं. पण, आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं आहे की, धन्यवाद! तुम्ही आम्हाला दिलेल्या त्या प्रत्येक आनंदी क्षणासह छोट्या-छोट्या आठवणींसाठी… ‘आमचे खेळाडू वर्ल्ड कप ट्रॉफी घेऊनच येत असतील’, अशी खास पोस्ट स्विगीने लिहिली आहे आणि अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसेच ही पोस्ट लिहून १२ वर्षांमधील प्रत्येक दिवस, महिने, आठवडे, तास, सेकंद यांना हायलाईट करण्यात आले आहे.

सोशल मीडियावर ही पोस्ट @swiggyindia यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. युजर ही पोस्ट पाहून ‘खूप छान’, ‘लकी पोस्ट’, ‘नक्कीच ट्रॉफी जिंकू’ अशा शब्दांत अनेक जण पोस्टखाली कमेंट करताना आणि भारतीय संघाला शुभेच्छा देताना दिसून आले आहेत.