Tata EV Car Bookings Start: टाटा मोटर्स भारतीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात कारची विक्री करते. टाटा मोटर्सच्या कार भारतीय बाजारात खूप पसंत केल्या जातात. दर महिन्याला सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत नेहमीच टाटाच्या कारचा समावेश असतो. सर्वसामान्य भारतीयांच्या खिशाला परवडेल आणि देशातील रस्त्यांवर उत्तम पळेल अशा कार डिझाईन करण्यासाठी टाटा मोटर्स ओळखले जाते.
सध्या ऑटो क्षेत्रात इलेक्ट्रिक वाहनांना ग्राहकांची जास्त मागणी आहे. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये मग ते दुचाकी वाहन असो किंवा कार ग्राहकांची रेंज फार मोठी आहे. सध्या, टाटा मोटर्स ही इलेक्ट्रिक कारची देशातील सर्वात मोठी विक्री करणारी कंपनी आहे. कंपनीने आधीच टाटा नेक्सॉन, टिगोर आणि टियागोसारख्या कार इलेक्ट्रिक स्वरूपात आणल्या आहेत. इलेक्ट्रिक गाड्यांच्या स्पर्धेत आता Tata Motors ने एक मोठा धमाका केला आहे. नुकतीच त्यांनी Tata Harrier.ev भारतात लाँच केली असून या कारची बुकिंगही सुरू करण्यात आली आहे. या कारचे फीचर्स व किंमत जाणून घेऊया…
Harrier.ev ही Tata ची पहिली सर्व्ह-व्हील ड्राइव्ह असलेली इलेक्ट्रिक कार ठरणार आहे. ब्रँडच्या इतिहासात ही एक महत्त्वाची पायरी मानली जात आहे. ह्या इलेक्ट्रिक SUV चे एकूण पाच व्हेरिएंट्स बाजारात उपलब्ध आहेत, ज्यात Adventure, Adventure S, Fearless+, Empowered आणि Empowered AWD चा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे, Tata EV वापरकर्त्यांसाठी एक लाखांचा लॉयल्टी बोनसही देण्यात येणार आहे, ज्यामुळे जुन्या ग्राहकांनाही या नव्या मॉडेलकडे वळायला प्रोत्साहन मिळणार आहे. या SUV चं सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे ती एका सिंगल चार्जमध्ये ६२२ किमी रेंज देते, जी तिच्या सेगमेंटमध्ये उल्लेखनीय मानली जाते.
Harrier.ev मध्ये दोन बॅटरी पॅक पर्याय आहेत, ज्यात ६५ kWh आणि ७५ kWh चा समावेश आहे. ६५ kWh बॅटरी असलेल्या व्हेरिएंट्समध्ये ५३८ किमीचा ARAI सर्टिफाईड रेंज मिळतो. ७५ kWh बॅटरी असलेल्या RWD आणि AWD मॉडेल्समध्ये अनुक्रमे ६२७ किमी आणि ६२२ किमी रेंज असल्याचा दावा करण्यात आला आहे.
पॉवरबाबत बोलायचं झालं तर: RWD मॉडेल २३८ hp पॉवर आणि ३१५ Nm टॉर्क देतो. AWD (dual motor) व्हेरिएंट तब्बल ३१३ hp आणि ५०४ Nm टॉर्क निर्माण करतो. या गाडीचं इंटीरियरही जबरदस्त अपग्रेड केलं आहे.
यामध्ये आहे – १०.२५ इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, सॅमसंग NEO QLED टेक्नॉलॉजीने सजलेली १४.५३ इंचाची Harman इंफोटेनमेंट स्क्रीन (जगातील पहिली), JBL Black साउंड सिस्टीम (Dolby Atmos सह १ स्पीकर्स), व्हॉइस कंट्रोल पॅनोरामिक सनरूफ, व्हेंटिलेटेड आणि मेमरी फंक्शन असलेली सीट्स, अॅम्बियंट लाइटिंग आणि बरेच काही.
Harrier EV मध्ये दिलेला नवा ५४० डिग्री कॅमेरा फंक्शन एक भन्नाट वैशिष्ट्य ठरत आहे. हे ३६० डिग्री सराउंड व्यू सिस्टीममध्ये एक विशेष अँगल जोडतं, जे कारच्या खालच्या भागाचं दृश्यही ड्रायव्हरला दाखवतं. “ट्रान्सपेरंट मोड” नावाने ओळखला जाणारा हा मोड ऑफ-रोड ड्रायव्हिंगसाठी अत्यंत उपयुक्त आहे, विशेषतः गटारं, मोठे खड्डे आणि कठीण भूभाग ओलांडताना.

टाटा Harrier EV ही भारतामधील पहिली इलेक्ट्रिक SUV आहे, जी ड्युअल मोटर AWD (All-Wheel Drive) सेटअपसह येते. यात प्रत्येकी एका ॲक्सलवर एक इलेक्ट्रिक मोटर आहे आणि जर तुम्ही “बूस्ट मोड” वापरला, तर ही SUV फक्त ६.३ सेकंदात ० ते १०० किमी/ताशी वेग गाठते. या कारची किंमत २१.४९ (एक्स-शोरूम) लाख रुपये ठेवण्यात आली आहे आणि या कारची डिलिव्हरीही लवकरच सुरू होणार असल्याची माहिती आहे.