माणूसकीपेक्षा मोठा धर्म कोणताच नाही! माणूसकी जिवंत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. द्वेष अन् शत्रुत्वामुळे समाजात फूट पडते. जोपर्यंत आपण एकमेकांच्या मदतीला धावून येत नाही आणि देश आणि नागरिकांची प्रगती होणार नाही. त्यामुळे जातीय भेदभावाच्या पलिकडे जाऊन जेव्हा माणसाला माणूसकी जपता आली पाहिजे. हीच शिकवण आपल्याला पिढ्यां पिढ्या दिली जाते. आजच्या काळात लोकांचा माणसूकीवरील विश्वास उठत चालला आहे अशा परिस्थितीमध्ये माणूसकीवरील विश्वास दृढ करणारी घटना सध्या चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका पोलिस कर्मचाऱ्याच्या कृतीने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे.

आजच्या काळात सर्वसामान्य लोक अत्यंक कष्ट करून जगत आहे. दोन वेळच्या जेवणासाठी हे लोक प्रचंड मेहनत करतात. पण, हे कष्ट इतके असतात की एखाद्याला विश्रांती करायची असेल तरीही क्षणभरासाठी वेळ मिळत नाही. व्हायरल व्हिडीओमध्ये एका कष्टकरी चहा विक्रेत्याची अशीच अवस्था झाली आहे. ट्रेनमध्ये चहा विकताना थकलेला चहा विक्रेता काही क्षण विश्रांती घेण्यासाठी बसला असताना त्याची झोप लागते. हे पाहून तेथून जाणारा पोलिस कर्मचारी जे करतो ते पाहून सर्वच जण थक्क झाले आहेत.

माणूसकी दर्शवणारी कृती (Policeman and tea vendor Viral Video)

हा व्हिडिओ पाहण्यास सामान्य वाटेल, परंतु या व्हिडिओमधून मिळालेला संदेश असाधारण आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की,’ट्रेनमध्ये दिवसभर चहाची किटली इकडे तिकडे घेऊन जाणारा एक चहा विक्रेता, थकल्यावर सीटवर विश्रांती घेत असताना, खाकी गणवेशातील एक माणूस तिथे येतो आणि त्याचा चहाची किटली उचलतो आणि लोकांना चहा वाटू लागलो. थोड्या वेळाने जेव्हा कामगाराने डोळे उघडतो तेव्हा त्याला धक्का बसतो की त्याची चहाचा किटली कुठे गेली. त्यानंतर पुढच्या क्षणीदिसते की, खाकी गणवेशातील माणूस चहावाल्याजवळ जातो आणि त्याला मिठी मारतो. त्यानंतर, तो त्याला चहा विक्रीचे पैसे देतो. चहा विक्रेता ते पैसे घेण्यास नकार देतो.

पोलीस आणि चहा विक्रेता (Police and tea seller)

या व्हिडिओमध्ये एवढेच आहे, पण ४३ सेकंदांचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, ज्या व्यक्तीने ही माणुसकी आपल्या आयुष्यात आणली, तो देवापेक्षा कमी नाही असे म्हटले जाते. आता लोक या व्हिडिओवर त्यांच्या कमेंट पोस्ट करत आहेत, चला जाणून घेऊया. या व्हिडिओवर बरेच लोक म्हणत आहेत की संपूर्ण स्क्रिप्ट चांगली आहे. यावर एकाने लिहिले, ‘ये स्क्रिप्ट असली तरी ती चांगली आहे जी चांगला संदेश देत आहे. त्यावर लक्ष द्या.” दुसरा लिहितो, या पोलिसाने त्याचे मन जिंकले आहे’. तिसरा लिहितो, ‘ काही लोक म्हण आहे की, हा अभिनय आहे. ठीक आहे अभिनय आहे, पण आपल्याला त्यातून खूप काही शिकण्याची गरज आहे’. एकाने लिहिले, ‘मानवता अजूनही जिवंत आहे’.