Train Toilet Tea Kettle Video: ट्रेनमध्ये फिरणाऱ्या विक्रेत्यांकडून खरेदी करताना तुम्हीही कधी ना कधी गरमागरम चहा घेतला असेल, पण जर तुमच्या समोर त्या चहाचा घाणेरडं वास्तव समोर आणणारा एक व्हिडीओ आला तर? सध्या सोशल मीडियावर असाच एक घृणास्पद आणि धक्का देणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो रेल्वेतील स्वच्छता आणि अन्न सुरक्षा यांच्यावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करतोय.
सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक आणि किळसवाणा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. चहाप्रेमींनाही चहा पिणे नकोसे वाटेल असा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत एक चहा विक्रेता रेल्वेच्या टॉयलेटमध्ये चहाची किटली धुताना दिसतो आहे आणि ते पाहून अनेकांच्या डोक्याचे तापमान वाढले आहे.
या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतेय की, संबंधित व्यक्ती ट्रेनच्या टॉयलेटचा दरवाजा उघडते आणि मग हात धुण्यासाठी असलेल्या भांड्याचा वापर करून चहाची किटली आरामात धुते आहे. स्वच्छतेबाबत कोणताही विचार न करता, तो बिनधास्तपणे सार्वजनिक टॉयलेटमध्ये अन्नपदार्थासाठी वापरल्या जाणाऱ्या भांड्याची साफसफाई करताना दिसत आहे.
हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा संताप उसळला असून, युजर्सनी “घृणास्पद”, “आरोग्याशी थट्टा”, “रेल्वेतील अन्न सेवा धोक्यात” अशा जोरदार आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. एका युजरने लिहिले, “यापुढे ट्रेनमध्ये चहा प्यायचा विचारही करणार नाही.” दुसऱ्याने थेट भारतीय रेल्वेला टॅग करीत विचारलं, “आता यावर काय कारवाई होणार?”
हा व्हिडीओ X (पूर्वीचं ट्विटर)वरून @BhanuNand या युजरने शेअर केला असून, त्यासोबत लिहिलं आहे, “जर तुम्ही ट्रेनमध्ये चहा प्यायचा शौक बाळगता, तर हा व्हिडीओ खास तुमच्यासाठी आहे.”
या प्रकरणावर @RailwaySeva हँडलकडून उत्तर देण्यात आलं आहे. त्यात म्हटलं आहे, “हा व्हिडीओ मुद्दामहून बदनामीसाठी तयार करण्यात आलेला आहे. हा माणूस रेल्वेचा अधिकृत कर्मचारी नाही आणि त्याने वापरलेली किटली नवीन आहे. भारतीय रेल्वेच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्यासाठीच हा व्हिडीओ बनवला गेला असून, संबंधित व्यक्तीवर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.”
वरील प्रतिक्रिया देण्यात आली असली तरी हा प्रकारसुद्धा काही नवीन नाही. याआधीही रेल्वेतील अस्वच्छता, अन्नाच्या दर्जाबाबत अनेकदा तक्रारी आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. पँट्री कारमधून अस्वच्छ पाण्याने भरलेली बाटली, गटाराजवळ अन्न शिजवणं असे प्रकार वेळोवेळी समोर आले आहेत.
येथे पाहा व्हिडीओ
चहा प्यायचा आनंद दुसऱ्याच्या गलिच्छ सवयींमुळे हिरावला जातोय? यावर यथोचित कारवाई होणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.