एखादं मातीचं भांडं जसा कलाकार घडवतो, अगदी त्याचप्रमाणे एक शिक्षिका विद्यार्थांना घडवत असते. शिक्षिका अभ्यासाची ओढ, संस्कार, आदर यांची भावना त्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात उमटवत असते. कारण याच गोष्टींमुळे हे विद्यार्थी उद्याचे एक आदर्श नागरिक ठरणार असतात. तर आज सोशल मीडियावरसुद्धा असंच काहीसं पाहायला मिळालं आहे. एका शिक्षिकेने तिच्या वर्गातील मुलीचा सर्वात खोडकर विद्यार्थिनी ते गरजू विद्यार्थ्यांची शिक्षिका असा प्रवास पोस्टमध्ये सांगितला आहे.

शिक्षिकेने पूर्वीचा आणि आत्ताचा एक फोटो शेअर केला आहे. या दोन्ही फोटोमध्ये १३ वर्षांचे अंतर आहे. या खास विद्यार्थिनीबद्दल सांगितले की, ‘दोन्ही फोटोंमध्ये १३ वर्षांचे अंतर आहे. अलिशा ही माझ्या वर्गातील सर्वात खोडकर मुलींपैकी एक होती. आश्चर्याची गोष्ट अशी की, तिने माझ्या वर्गातील एका मुलाचा दात तोडला होता. कारण तो तिला प्रचंड त्रास द्यायचा. शाळेतील इतर शिक्षक मला अलिशाबद्दल नेहमीच सावध राहायला सांगायचे.

रेव्हस (Revs) असे या शिक्षिकेचे नाव आहे. शिक्षिकेने अलिशाचे वर्णन करताना सांगितले की, ती स्वतःची बॉस होती. तिला जे करायचे आहे ते ती करूनच शांत बसायची. त्यामुळे शिक्षिका अनेकदा अलिशाच्या भविष्याबद्दल विचार करायच्या. तिला आपण काही मदत करू शकतो का, असे त्यांना नेहमी वाटायचे. अलिशाची घरची परिस्थिती थोडी बिकट होती. आजारी वडील, बेडवर झोपून असायचे तर आई मासे विक्रेती होती.

हेही वाचा…नियम पाळून स्मार्ट व्हा! प्रसिद्ध ब्रँडच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी दिली सक्त ताकीद; पाहा हटके पोस्ट

पोस्ट नक्की बघा…

जसजशी वर्षे निघून गेली, तसतशी अलिशाने महामारीच्या काळात महाविद्यालयात नेव्हिगेट केले व तिने स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल केली. रेव्हसने तिच्या पोस्टमध्ये सांगितले की, जेव्हा तिने शिक्षण क्षेत्रात जाण्याचे ठरवले व शिक्षिका व्हायचे स्वप्न पाहिले तेव्हा तिचे जीवन बदलले. २०२४ मध्ये अलिशाचा प्रवास पूर्ण झाला, कारण ती मुंबईतील एका प्रतिष्ठित शाळेत शिक्षिका आहे. ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची गरज आहे त्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचे ती काम करते. तिने गरजू विद्यार्थ्यांना शिकवण्याचे का ठरवले, याचे श्रेय तिच्या रेव्हस या शिक्षिकेला देते. कारण अलिशाला शाळेत सर्व जण खोडकर समजायचे आणि इतरांकडून खोडकर समजल्या जाणाऱ्या मुलांना पाठिंबा कसा द्यायचा हे अलिशाने तिच्या शिक्षिकेकडून शिकले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन वर्षांनी एका संस्थेकडून शिक्षिकेला अलिशाने ‘तुम्ही कोणत्या व्यक्तीचे सर्वात जास्त कौतुक कराल’ या विषयावर लिहिलेला निबंध लिहिला. अलिशाने तिच्या निबंधात रेव्हस या शिक्षिकेबद्दल लिहिले आणि शिक्षिका हे पाहून खूप प्रभावित झाल्या. “मी शिकवलेल्या मुलांकडून, त्यांच्या पालकांकडून मला प्रेम, करुणा मिळते आहे हे पाहून एक व्यक्ती म्हणून मला खूप अभिमान वाटतो”, असे अलिशाने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. अशी हृदयस्पर्शी गोष्ट शिक्षिकेच्या @Full_Meals या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे, जी सध्या अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.