Tesla Car accident : हल्ली प्रत्येकाला जास्तीत जास्त अँडव्हान्स फिचर्स असलेली कार खरेदी करायची असते. पूर्वी लोक कार ही गरज म्हणून खरेदी करीत होते. पण आता ॲडव्हान्स फीचर्स असलेली कार एक स्टेटस सिंबल बनले आहे. जितकी महागडी कार तितकीच त्याची स्तुती केली जाते. त्यामुळे कारच्या अनेक जुन्या मॉडेल्समध्ये नवी फीचर्स ॲड केली जात आहेत. पूर्वी गियर आणि क्लच असलेल्या कार येत होत्या; पण आता ऑटोमॅटिक कार बाजारात आल्या आहेत. त्यात टेस्लाने ड्रायव्हरशिवाय चालणारी ऑटोमॅटिक कार लाँच केली आहे. पण हीच ऑटोमॅटिक कार आता प्रवाशांच्या जीवावर उठली आहे. या कारच्या अपघाताचा एक थरकाप उडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे; ज्यात एक ऑटोमॅटिक टेस्ला कार रस्त्यावर बुलेटच्या स्पीडने धावतेय आणि तिच्यासमोर येणाऱ्या गाड्यांना सरळ उडवत निघून जातेय.

टेस्ला कारची किंमत खूप जास्त आहे. तरीही लोक एक हौस म्हणून ती खरेदी करतात. पण, जेव्हा या कारच्या फंक्शन्समध्ये बिघाड होतो तेव्हा तो जीवघेणा ठरतो. मग अशा प्रकारे अपघात होतात, जे पाहताना अंगाचा थरकाप उडतो. अलीकडेच चीनच्या ग्वांगडोंग प्रांतातून एका अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे; जो पाहताना तुम्हालाही भीती वाटेल, यामध्ये एका टेस्ला कारचा स्पीड आउट ऑफ कंट्रोल झाला आणि ती रस्त्यावर बुलेटच्या स्पीडने धावताना दिसली. बुलेटच्या स्पीडने धावणाऱ्या या टेस्ला कारने आपल्या मार्गात येणाऱ्या वाहनांना उडवले.

चीनमधून समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ड्रायव्हर टेस्ला कार पार्क करण्यासाठी रस्त्याच्या बाजूला घेत असतो. पण, याच वेळी अचानक स्पीड आउट ऑफ कंट्रोल होतो. त्यानंतर कार बुलेटच्या स्पीडने धावत सुटते. ड्रायव्हर खूप प्रयत्न करतो; पण कारचे ब्रेकही फेल झालेले दिसतात. यावेळी कार थांबण्याऐवजी बुलेटच्या वेगाने धावू लागते. यादरम्यान कारने दोन जणांचा जीव घेतला. शेवटी रस्त्याच्या कडेला आदळून ही कार थांबली. रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या अनेक सीसीटीव्ही फुटेजमध्ये कार किती वेगाने धावतेय ते दिसून आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला; ज्यावर अनेकांनी ही चीनची करामत असल्याचे म्हटले आहे. पण या व्हिडीओसह दिलेली कॅप्शन चुकीची असल्याचे एका युजरने लिहिले आहे. त्याने सांगितले की, ही कार एक वृद्ध व्यक्ती चालवत होती; ज्याने ब्रेकऐवजी ॲक्सिलेटरवर पाय ठेवला होता. अनेकांनी कमेंटमध्ये टेस्ला कारवर टीका करीत कारमधील ॲडव्हान्स फीचर्स फक्त अपघातांना आमंत्रण देतात, असे म्हटले आहे.