माणूसकी तपासण्यासाठी अनेक लोक वेगवेगळे प्रयोग करत असतात. एखादी अशी परिस्थिती निर्माण करणे की त्या परिस्थितीत समोरचा व्यक्ती कसा वागतो, हे पाहणे होय. समोरच्याच्या वागणूकीतून माणूसकी तपासली जाते.
सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण माणूसकी तपासण्याचा प्रयत्न करत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की हा तरुण भर रस्त्यावर स्वत:हून खाली पडतो आणि मदतीसाठी हात मागतो पण व्हिडीओत तुम्हाला दिसेल की काही लोकं त्याला मदत करत नाही. त्यानंतर तो पुन्हा असाच स्वत:हून खाली पडतो तेव्हा एक म्हातारीचे केस (Candy Floss)विकणारा चिमुकला त्याच्या मदतीला धावून येतो आणि त्याला उठण्यासाठी हात देतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, “संस्कार असावे तर असे!”

हेही वाचा : VIDEO : अमिताभ बच्चन हातात फावडे घेऊन खोदकाम करताहेत? काय आहे प्रकरण, पाहा व्हायरल व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

zindagi.gulzar.h या अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “फक्त गरीब लोकांमध्ये माणूसकी असते” तर एका युजरने लिहिलेय, “माणूस मनाने श्रीमंत असायला पाहिजे”