सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडीओचं व्यासपीठ आहे. इथे रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो. काही व्हिडीओ पाहिल्यानंतर आश्चर्याचा धक्का बसतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ रस्त्यावर ठेवलेलं अंड टायरखाली येऊनही फुटलं नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पण नेमकं अंड का फुटलं नाही याचं उत्तर व्हिडीओ पाहिल्यानंतर मिळतं. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत ट्रकच्या शेवटच्या दोन चाकाखाली अंड येतं. त्यामुळे आता अंड फुटेल असंच सर्वांना वाटतं. पण चाक त्यावरून उलटून गेल्यानंतरही अंड तसच्या तसं राहतं. यामुळे काही जण आश्चर्य व्यक्त करत आहे. पण हा काही चमत्कार नसून दोन चाकांच्या फटीत अंड असल्याने त्याला काहीही होत नाही.

व्हायरल व्हिडीओत आपल्याला दिसेल ट्रकचं पुढचं चाक सिंगल आहे. त्यानंतर मागच्या दोन चाकांमध्ये दोन दोन चाकं लावली आहेत. त्यामुळे दोन चाकांमध्ये अंड फुटणार नाही इतकी फट आहे. त्यामुळे अंड बरोबर त्या फटीत आल्याने फुटत नाही. पण जरासा तरी चाकाचा भाग लागला असता तर मात्र अंड फुटलं असतं. अनेक जण ड्रायव्हरचं कौशल्य असल्याचं मानत आहेत. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर techniiverse पेजवरून शेअर करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ नेटकरी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. तसेच या व्हिडीओला हजारो लाइक्स मिळाले असून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.