“काय झाडी… काय डोंगार… काय हाटील… एकदम ओके” हे शब्द मागील काही दिवसांमध्ये अनेकदा तुमच्या कानावर पडले असतील किंवा एखाद्या मिस्मसच्या पेजवर वाचनात आले असतील. शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू राजाराम भोसले-पाटील याच शब्दांमुळे चर्चेत आले. शहाजीबापू पाटील यांचे व्हायरल ऑडिओमधील हे शब्द तुफान व्हायरल झाले. शहाजीबापू पाटील यांच्या “काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल” वाक्याची इतकी चर्चा होती की यावरुन चक्क गाणीही तयार करण्यात आली आहेत. राज्यातील सत्तासंघर्षाचे गुवाहाटी हे केंद्र बनलेलं असताना या सत्ताकारणाच्या वातावरणात ही ऑडिओ क्लिप प्रचंड व्हायरल झाली होती. दरम्यान, एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांना देखील असाच काहीसा अनुभव आला आहे.

एक ऑस्ट्रेलियन कंपनी आपल्या संपूर्ण टीमला कंपनीच्या खर्चावर दोन आठवड्यांच्या बाली सहलीला घेऊन गेल्याने, जगभर हेवा वाटावा अशी कंपनी बनली आहे. सिडनी-आधारित जाहिरात फर्म सूप एजन्सीने मे महिन्यात आपल्या टीमसमवेत उबुद, बाली येथील एका लक्झरी व्हिलामध्ये दोन आठवड्यांसाठी वर्क फ्रॉम बालीचा निर्णय घेतला.

Viral : बॉसपर्यंत अर्ज पोहचवण्यासाठी या पठ्ठ्याने लढवली अजब शक्कल; मुलाची कृती पाहून नेटकरीही हैराण

कंपनीच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये असे दिसून आले आहे की कर्मचाऱ्यांनी हायकिंग, स्नॉर्केलिंग, स्विमिंग आणि क्वाड बाइकिंग यांसारख्या टीम-बॉन्डिंग अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये भाग घेतला. सूपचे व्यवस्थापकीय संचालक, कात्या वाकुलेन्को यांनी डेली मेलला सांगितले की, बालीला १४ दिवसांची कामाची सहल हा संघ बांधणीचा उत्तम अनुभव होता.

त्या पुढे म्हणाल्या, “‘मला वाटते की कामाच्या ठिकाणी सर्वांनी एकत्र काम करणे महत्वाचे आहे, मुख्यतः कामाच्या वेळेच्या आत आणि बाहेरही. कोविड-१९ ने आम्हाला शिकवले की काम करण्याचे नवीन मार्ग आहेत आणि मूलत: आपण कुठूनही काम करू शकतो. म्हणून आम्ही ते खरोखरच पुढच्या स्तरावर नेण्याचा निर्णय घेतला.”

लहानग्या कुत्र्याचा गोंडस बंड पाहिला का? Viral Video पाहून तुम्हीही म्हणाल, ‘किती गोड!’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कंपनीचे डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, कुमी हो, म्हणाले, “ही एक कार्यरत सहल असूनही आणि विविध विभागांतील कर्मचाऱ्यांना पहिल्यांदाच एकत्र काम करत असूनही, उत्पादकता उच्च राहिली. संपूर्ण एजन्सीने एकत्र काम करणे, संवाद साधणे आणि सहयोग करणे हे मनाला ताजेतवाने करणारे होते. हा नक्कीच जीवनातील एक सुखद अनुभव होता जो मी कधीही विसरणार नाही,” दरम्यान, सूप एजन्सी पुढील वेळी युरोपमध्ये या कामाच्या सुट्टीची पुनरावृत्ती करण्याची योजना आखत आहे.