अंचित आणि आदित्य गढवी यांचे खलासी गाणे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नवरात्रीच्या काळात तर सर्वत्र हेच गाणे ऐकायला मिळत होते. लोक या गाण्यावर रिल्स बनवून पोस्ट करत आहेत. या गाण्यावर जबरदस्त डान्स करता आपले कौशल्य दाखवत आहे. दरम्यान आता खलासी गाण्यावर एका तरुणीच्या बेली डान्सचा व्हिडीओ चर्चेत आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये पाहून नेटकरी तिचे चाहते झाले आहेत. खलासी गाण्यावर विविध प्रकारचे डान्स व्हिडीओ पाहिले असतील पण खलासी गाण्यावर अप्रतिम डान्स करणारी व्यक्ती तुम्ही क्वचितच पाहिली असेल.

हेही वाचा – एका भारतीय व्यक्तीच्या पत्रामुळे इंग्रजांनी रेल्वेमध्ये बनवले टॉयलेट; काय लिहिले होते या पत्रात? जाणून घ्या

व्हायरल व्हिडीओ _diyabhatt15 नावाच्या अकांऊटवर शेअर केला आहे. ही तरुणी एका ठिकाणी उभी आहे तिने लाल लेहेंगा आणि काळा टॉप परिधान केला आहे. जसे खलासी गाणे वाजण्यास सुरुवात होते तसे त्यावर ती थिरकू लागते. अगदी अलगदपणे ती गाण्यावर बेली डान्स करत आहे. तिचे डान्स पाहून लोक तिचे कौतूक करत आहे. तुम्ही बेली डान्सचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील पण इतका अप्रतिम डान्स कोणीही केला नसेल. या व्हिडीओमध्ये २४ ऑक्टोबरला शेअर करण्यात आला आहे. पोस्ट केलेल्या व्हिडीओ आतपर्यंत ३० लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे.

हेही वाचा – ऐकाव ते नवलचं! फक्त चार फुट जागेत उभारली तीन मजली इमारत; व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हायरल व्हिडीओवर कमेंट करत एकाने म्हटले,”खरचं भन्नाट डान्स केला.” दुसऱ्याने सांगितले की, आणि मला वाटले की यापेक्षा आणखी चांगले हे गाणे असू शकत नाही पण तुम्ही ते आणखी चांगले बनवले आहे.” तिसरा म्हणाला, अप्रितम” चौथा म्हणाला, की, “जबरदस्त डान्स!” पाचव्याने सांगितले की,”तुम्ही खरचं ऍ१अप्रतिम आहात”