लग्न हे प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण असतो. प्रत्येक मुलगा किंवा मुलगी आपल्या लग्नाचे स्वप्न पाहतात. आपला भावी जोडीदार कसा असेल याची कल्पना करतात आणि जेव्हा हे स्वप्न सत्यात उतरते तेव्हा त्यापेक्षा आनंदाची गोष्ट दुसरी कोणतीही असू शकत नाही. अरेंज असो की लव्ह, लग्न करताना प्रत्येक मुलगा किंवा मुलीची एवढीच इच्छा असते की त्यांना मनासारखा जोडीदार मिळाला पाहिजे. जेव्हा मनासारखा जोडीदार मिळतो तेव्हा लग्नातील प्रत्येक क्षण नवरा- नवरी दोघांसाठी आनंदी आणि आणखीच खास होतो. अशाच एका नवरा नवरीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे जिला मनासारखा जोडीदार मिळल्याचा आनंद झाला आहे. नवऱ्यानं लग्नाच्या दिवशी पहिल्यांदा जेव्हा होणाऱ्या बायकोला पाहिलं तेव्हा अशी भन्नाट रिअॅक्शन दिली की पाहून तुम्हीही कौतुक कराल.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, लग्नासाठी नवरी तयार होत असते, यावेळी तिथे नवरदेव येतो आणि नवरीला पाहून शॉक होतो आणि तोंडाला हात लावतो. यावर नवरीच्या मैत्रीणी त्याला विचारतात की, कशी दिसतेय? यावर नवरदेव म्हणतो..”कसली गोड दिसायली.. एकच नंबर” यावर नवरीही लाजताना आणि आनंदी दिसत आहे.
लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास, महत्त्वाचा असा क्षण असतो आणि हा क्षण फक्त नवरा-नवरीच नव्हे तर सर्वांच्या कायम लक्षात राहावा यासाठी प्रयत्न केले जातात. अगदी सध्या नवरा-नवरीसुद्धा आपल्याच लग्नात काही ना काही सरप्राइझ देण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक जण आपल्या लग्नाचा दिवस कायम लक्षात रहावा यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. लग्न म्हटल्यावर भरमसाठ नातेवाईक, पंचपक्वान आणि डीजेचा ताल या गोष्टी आल्याच.प्रत्येक मुलगा किंवा मुलगी आपल्याला कशी बायको हवी यासाठी काही स्वप्न पाहत असतात. सुशील, सुंदर, चांगलं जेवण बनवणारी अशी मुलगी असावी अशी प्रत्येकच मुलाची अपेक्षा असते. अशात आता सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये नवरदेवाचं प्रेम पाहून तुम्हीही म्हणाल प्रत्येक मुलीला असाच नवरा मिळो.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ सोशल मीडियावर manasi_sujit या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला लाखोंमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. तर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, अशाच छोट्या छोट्या गोष्टींमुळे प्रेम वाढतं.