इन्फ्लुएन्सर हिमतसिंग्का नावाच्या व्यक्तीने कॅडबरीच्या बॉर्नव्हिटा उत्पादनावर टीका करणारा एक व्हिडीओ शेअर केला होता. त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कॅडबरीकडून त्याला कायदेशीर नोटीस मिळाली, त्यानंतर इन्फ्लुएन्सरने आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून काढून टाकला आहे. या बाबतची माहीत स्वत: इन्फ्लुएन्सरने दिली असून व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, हिमतसिंग्का कॅडबरीच्या बॉर्नव्हिटा या उत्पादनावर टीका केली होती. ज्यामुळे त्याला ही नोटीस दिल्याचं सांगण्यात येत आहे. तर ही नोटीस मिळालेल्या व्यक्तीने उत्पादनाच्या पॅकेजिंगवर केलेल्या दाव्यांचीही चेष्टा केली होती.

हिमतसिंग्का यांने रीलच्या कॅप्शनमध्ये लिहिलं होतं, “सरकारने कंपन्यांना त्यांच्या पॅकेजवर उघडपणे खोटे बोलण्याची परवानगी द्यायला पाहिजे का? पालक त्यांच्या मुलांना लहान वयात साखरेचे व्यसन लावत आहेत आणि मुले आयुष्यभर साखरेसाठी तळमळत राहतात.” शिवाय त्याने ही पोस्ट सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर शेअर केली होती. डिलीट करण्यात आलेली पोस्ट इंस्टाग्रामवर १२ मिलियनहून अधिक वेळा पाहिली गेली होती. तर ही पोस्ट प्रसिद्ध अभिनेते परेश रावल, माजी क्रिकेटपटू आणि खासदार कीर्ती आझाद यांनीदेखील शेअर केली होती.

हेही पाहा- Video: अतिक अहमदची हत्या करणाऱ्या आरोपीचे शेवटचे Reel व्हायरल, रीलमधील गाणे ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!

मिळालेल्या माहितीनुसार, Cadbury Bournvita ने ९ एप्रिल २०२३ रोजी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर उत्पादनाबद्दल स्पष्टीकरण दिले होते. ज्यामध्ये कंपनीने सांगितले की, “बॉर्नव्हिटामध्ये व्हिटॅमिन ए, सी, डी, लोह, जस्त, तांबे आणि सेलेनियम यांसारखे पोषक घटक असतात, जे रोग प्रतिकारशक्ती निर्माण करण्यास मदत करतात. हे अनेक वर्षांपासून आमच्या फॉर्म्युलेशनचा भाग आहेत. शिवाय आमचे उत्पादन शरीर निरोगी ठेवण्यास आणि प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते.

हेही वाचा- अंधश्रद्धेचा कळस! ‘या’ गावात २ अल्पवयीन मुलांचे चक्क भटक्या कुत्र्यांशी लावले लग्न

दरम्यान, शुक्रवारी हिमतसिंग्का यांने कंपनीची माफी मागितली. त्याने इंस्टाग्रामवर एक निवेदन जारी केले, ज्यामध्ये लिहिलं होते, “१३ एप्रिल रोजी भारतातील सर्वात मोठ्या लॉ फर्मपैकी एकाकडून कायदेशीर नोटीस मिळाल्यानंतर मी (बॉर्नविटा) व्हिडिओ काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. व्हिडिओ बनवल्याबद्दल मी कॅडबरीची माफी मागतो. कोणत्याही ट्रेडमार्कचे उल्लंघन करण्याचा किंवा कोणत्याही कंपनीची बदनामी करण्याचा माझा हेतू नव्हता. तसेच न्यायालयीन खटल्यात भाग घेण्याची माझी इच्छा नाही, त्यामुळे कंपनीने देखील हे प्रकरण पुढे वाढवू नये अशी विनंती करतो”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, नोटीस मिळाल्यानंतर सोशल मीडियावरुन हटवलेल्या व्हिडिओमध्ये इन्फ्लुएन्सरने पहिल्यांदा बोर्नव्हिटाचे फायदे स्पष्ट केले. त्यानंतर त्याने म्हटलं होतं, १०० ग्रॅम बोर्नव्हिटामध्ये ५० ग्रॅम साखर असते. मुळात, संपूर्ण या पिशवीचा अर्धा भाग फक्त साखर आहे. त्याने लिहिलेल्या या आक्षेपार्ह मजकुरामुळेच त्याच्यावर कंपनीने कायदेशीर नोटीस पाठवली होती.