जर तुम्हाला उंचीची भीती वाटत असेल आणि तुम्ही डोंगराळ भागातून जाताना घाबरत असाल तर तुम्ही हा व्हिडीओ पाहू नये. ऑनलाइन व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये बाली या सुंदर इंडोनेशियन बेटावर एक फोटोग्राफर टेकडीवर उभ्या असलेल्या विमानाच्या पंखावर चालताना दिसत आहे. हे विमान निवृत्त बोईंग विमान आहे. हे विमान एका टेकडीवर ठेवण्यात आले होते आणि समोर समुद्रकिनाऱ्याचे विहंगम दृश्य होते.
अर्थपिक्सने हा व्हायरल व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या छोट्या क्लिपमध्ये, फोटोग्राफर कोमिंग दर्मावन एका टेकडीवर निवृत्त विमानाच्या पंखांवर चालताना दिसतो. पोस्टच्या कॅप्शननुसार, विमानाचे रूपांतर उलुवातु बडुंग रीजन्सीमधील न्यांग-न्यांग बीचजवळ पर्यटकांच्या निवासस्थानात केले जाणार आहे. आपण व्हिडीओमध्ये पाहू शकतो की कॅमेरा हळूहळू हिरव्यागार रीफ आणि समुद्रकिनाऱ्याच्या नेत्रदीपक दृश्याकडे सरकतो.
२५ वर्षाच्या मुलीने ६० वर्षाच्या वृद्धासोबत केलं लग्न; लग्नानंतर तरूणीचे दिलेली रिअॅक्शन व्हायरल
फोटोग्राफर विमानाच्या पंखाच्या टोकाला जाऊन थांबला. व्हिडीओ पाहताना तो मृत्यूच्या तोंडाजवळ उभा आहे असे वाटत होते. विमानाचा पंख वाऱ्याने हलला तर त्याचा तोलही जाऊ शकतो आणि त्याचा जीव धोक्यात येऊ शकतो. कमिंगचा शोध घेत असताना फोटोग्राफर या निवृत्त बोईंग विमानापर्यंत पोहोचला, तेथून त्याने अतिशय सुंदर दृश्य आपल्या कॅमेऱ्यात टिपले.
Viral: …अन् तरुणीने घागरा घालून ट्रेडमिलवरच सुरु केला गरबा; हा Video एकदा बघाच
समुद्रकिनारी खडकावर ठेवलेले विमान अतिशय नयनरम्य दिसते. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, ‘हे विमान उलुवातु बडुंग रीजेंसीमधील न्यांग-न्यांग बीचजवळ पर्यटकांच्या निवासस्थानात रूपांतरित केले जाणार आहे.’