पाळीव कुत्रा हातातून निसटून पळून गेला म्हणून एका महिलेला शेजाऱ्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महिलेला मारहाण केल्याप्रकरणी बुधवारी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. २६ जून रोजी संध्याकाळी सर्व प्रकार घडला.

तक्रारदार नताशा सतीजा या नुकत्याच गाझियाबादमधील वेव्ह एक्झिक्युटिव्ह फ्लोअर्समध्ये शिफ्ट झाल्या होत्या. नताशा त्यांच्या बहिणीसह दोन कुत्र्यांना घेऊन शास्त्रीनगर येथे वडिलांच्या घरी निघाल्या होत्या. दरम्यान सोसायटीच्या परिसरामध्ये त्यांच्या हातातील एक कुत्रा त्याचा पट्टा सोडवून पळून जातो. नताशा सतीजा यांच्या मते, नव्या परिसरात आल्यामुळे त्यांचा कुत्रा घाबरलेला होता आणि त्यांना नवीन परिसराची अजून सवय झालेली नव्हती. त्यामुळे त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला असावा.”

दरम्यान नताशा कुत्र्याला पकडण्यासाठी त्याच्या मागे धावत जातात तेव्हा सोसायटीतील रहिवासी पिंकी सिंग, तिचा पती आणि मुलगा हे कुंटुब त्यांची वाट अडवते. कुत्र्याला पट्टा बांधूनच ठेवले पाहिजे असे सांगत शिवीगाळ करतात. दरम्यान ”घडल्या प्रकाराबाबत मी त्यांची मागितली आणि पुन्हा असे होणार नाही असे सांगत आश्वस्तही केले. तरीही त्यांनी माझा अपमान केला. एवढ्यावरच ते थांबले नाही पिंकी सिंग यांनी मला कानाखाली मारली आणि तिच्या पतीने मला बुटानेही मारले” नताशा सतीजा यांनी सांगितले.

हेही वाचा – बाईकचा टेबल अन् प्लॉस्टिक पिशवीची प्लेट! घाईघाईत जेवत होता भुकेला डिलिव्हरी बॉय; Video पाहून नेटकरीही झाले भावूक

जेव्हा सतीजाच्या बहिणीने या वादामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा या जोडप्याने तिला मारहाण केली आणि दुसऱ्या कुत्र्यालाही लाथ मारली. जेव्हा नताशा त्यांना इजा करू नका असे सांगितले तेव्हा त्यांनी तिचा आणखी अपमान केला. सतीजा यांनी दावा केला, ”या जोडप्याने माझे कपडे फाडण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या चेहऱ्यावर आणि पाठीवर खुणा दिसत आहे.”

जेव्हा सतीजाच्या बहिणींनी पोलिसांना बोलावू असे सांगितले तेव्हा त्यांनी त्याचे परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली.

हेही वाचा – नकारामुळे वैतागून पठ्ठ्याने वाढवली स्वत:ची उंची, सर्जरीसाठी खर्च केले तब्बल ६६ लाख रुपये, पाहा व्हिडीओ

घडलेल्या प्रकारामुळे धास्तावले महिला आणि तिचे कुटुंब

“आम्ही कशातरी सुटलो. या धमक्यांमुळे माझी बहीण, मला, तसेच अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या आमच्या आईला असुरक्षित वाटू लागले आहे,” असे तक्रारदार सतीजाने पोलिसांना सांगितले. लॉबीमध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासा आणि माझ्या दाव्यांची पडताळणी करण्यासाठी माझी आणि माझ्या बहिणीची वैद्यकीय तपासणी करा असेही त्यांनी पोलिसांना सांगितले.

दरम्यान तक्रारीच्या आधारे, या जोडप्यावर आयपीसी कलम ३२३ (प्राणघातक हल्ला), ५०४ (हेतूपूर्वक हल्ला) आणि ५०६ (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत, आणि त्यानुसार कारवाई केली जाईल,” असे एसीपी (वेव्ह सिटी), रवी प्रकाश सिंग यांनी सांगितले.