टेस्ला कंपनीचे सीईओ इलॉन मस्क हे जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्या कंपनीच्या गाड्या जगभरात प्रसिद्ध आहेत. प्रत्येकजण त्यांनी उद्योगाशी संबंधीत सल्ले काळजीपूर्वक ऐकतात आणि आपल्या व्यवसायात त्यांचा वापर करतात. सदैव चर्चेत राहणारे इलॉन मस्क यांना एकदा तरी भेटता यावं अशी इच्छा अनेकांच्या मनात असते. पुण्यातील एका तरुणांची ही इच्छा पूर्ण झाली आहे. प्रणय पाथोळे असे या तरुणाचे नाव असून यासंबंधीचे एक ट्विट त्याने पोस्ट केले आहे.

२३ वर्षीय प्रणय मशीन लर्निंग इंजिनीअर आहे. त्याला अंतराळ आणि रॉकेटमध्ये खूप रस आहे. तो इलॉन मस्क यांचा मोठा फॅन आहे आणि त्यांना भेटता यावं ही त्याची इच्छा होती. त्याची ही इच्छाही पूर्ण झाली आहे. प्रणयला अमेरिकेत जाऊन आपल्या आयडलला भेटण्याची संधी मिळाली. यासंबंधीत माहिती त्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेयर केली आहे.

मैत्रिणीसोबत कारमध्ये सापडलेल्या भाजपा नेत्याला बायकोने रस्त्यावरच चप्पलने झोडपलं; Video होतोय व्हायरल

इलॉन मस्क यांना भेटल्यावर प्रणयने त्यांच्यासोबतचा फोटो शेयर केला आहे. त्याने आपल्या ट्विटरमध्ये म्हटलंय, टेक्सासच्या गिगा फॅक्टरीमध्ये इलॉन मस्क यांना भेटून खूप छान वाटले. मी इतके नम्र आणि सर्वसाधारण व्यक्तिमत्त्व कधीही पाहिले नाही. तुम्ही लाखो लोकांसाठी प्रेरणा आहात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रणव टाटा कंन्सल्टंसी सर्व्हिसमध्ये काम करतो. दरम्यान, प्रणव अनेक मुद्द्यांवर इलॉन मस्क यांच्याबरोबर नियमितपणे ट्विटरवर चर्चा करत असतो. चार वर्षांपूर्वी त्याने मस्क यांच्याबरोबर सोशल मीडियावर पहिल्यांदा संभाषण केले.