‘देव तारी त्याला कोण मारी’ असं आपण म्हणत असतो, याच म्हणीचा प्रत्यय आपल्याला सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमधून अनेकवेळा येत असतो. अनेक मोठमोठ्या अपघातांमधून काही लोकं सुखरुप वाचल्याचं आपण पाहिलं आहे. सध्या असाच एक भयानक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक ट्रक भरधाव वेगाने येत असल्याचे दिसत आहे. त्याचवेळी त्या रस्त्यावर एक बाईकस्वार इकडे-तिकडे न बघता थेट पुढे जातो. अचानक समोर आलेली दुचाकी पाहून ट्रकचालक ट्रक एका बाजूला वळवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचवेळी ट्रक अनियंत्रित होतो आणि तो रस्त्याकडेला धडकल्याचं व्हिडीओत दिसत आहे. या अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

हेही पाहा- GST विभागाचा अजब कारभार; बेरोजगार तरुणाला पाठवली १ कोटी ३६ लाखांचा टॅक्स भरण्याची नोटीस

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एका दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर IPS अधिकारी दिपांशू काबरा यांनी @ipskabra या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण, एवढा मोठा अपघात होऊनही दुचाकीस्वार सुखरुप वाचला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘असा वेग ठेवा, अपघात कधीच होणार नाही आणि इतरही सुरक्षित राहतील आणि तुम्हीही सुरक्षित राहाल.’

हेही पाहा- मेडिकलमध्ये ORS घ्यायला गेलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू, हृदय पिळवटून टाकणारा Video व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ शेअर केल्यापासून ३० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक यूजर्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कमेंट करताना एका यूजरने लिहिले आहे की, ‘देव तारी त्याला कोण मारी’, तर दुसर्‍या यूजरने लिहिले आहे, ‘बाईक चालकांची चुक मोठ्या वाहनांना कशी महागात पडते ते पाहा.’ आणखी एका नेटकऱ्याने असं म्हटलं आहे की, ‘ट्रक चालकाने दुचाकीस्वाराला वाचवण्याचा प्रयत्न केला नसता तर तो चिरडला असता, रस्त्यावरून मुख्य रस्त्यावर येण्याचे नियमांचे अनुसरण करायला हवं’