जगात एकीकडे गुन्हेगारी, फसवणूक, युद्ध आणि संघर्ष सुरु आहे तर दुसरीकडे अजूनही असे लोक आहेत जे माणुसकी टिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. असे कित्येक लोक आहेत जे आजही संकटात असलेल्याच्या मदतीला धावून येतात. हे लोक खऱ्या आयुष्यातील हिरो आहेत. सोशल मीडियावर अशाच एका व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्याने माय-लेकराच्या जीव वाचवला आहे. एक महिला तिच्या लेकरासह नदीत उडी मारणार होती तेवढ्यात एक बस चालक देवासारखा मदतीला धावून आला. हा सर्व प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. लोक बस चालकाचे कौतूक करत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एक महिला रस्त्यावरून रडत रडत जात आहे तिच्याबरोबर एक लहान मुलं देखील आहे. त्याचवेळी तेथून एक बस जात असते. महिलेला रडताना पाहून बस चालक बस थांबवतो. अचानक ती नदीच्या पुलावर थांबते आणि काहीही विचार न करता थेट मुलासह नदीत उडी मारण्याचा प्रयत्न करते. सुदैवाने बस चालक उडी मारण्याआधीच महिलेला अडवतो. बसचालकाच्या प्रसंगवाधनामुळे महिला आणि तिच्या मुलाचा जीव वाचतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा – पोह्याचा अपमान करणे महिलेला पडले महागात; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले, “तू चांगले अन्न…”

हेही वाचा – हे भन्नाट आहे राव! महिलेने पर्समधून बाहेर काढली हटके सायकल, चिमुकलीला बसवलं अन्….पाहा व्हायरल VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एक्स अर्थात ट्विटरवर हा व्हिडीओ PicturesFoIder नावाच्या अकांउटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ आतापर्यंत २३.५ मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. व्हिडीओ पाहून लोकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.काहींनी महिलेने असे का केले याबाबत राग व्यक्त केला आहे तर काहीजणांनी बसचालकाचे कौतूक केले आहे. एकाने लिहिले की, “मला समजत नाही, देव अशा लोकांना मुलं का देते?” आणखी एकाने लिहिले की, “खूपच वाईट व्हिडीओ आहे”